आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये कांद्यांने ओलांडली शंभरी, १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री; जानेवारी महिन्यापर्यंत दरात तेजी राहण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी कांदा टंचाई झाल्याने किरकोळ बाजारातील दर हे ७० ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत गेले होते. यंदा मात्र दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. दिवाळीपर्यंत टिकणारा उन्हाळ कांदा यंदा दुष्काळामुळे काही शेतकऱ्यांनी विलंबाने केला होता. तो कांदा बाजारात येत आहे, मात्र तो कांदा १२ ते १४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. हा दर मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ०.१ टक्का आहे. आवक नसल्याने किरकोळ बाजारात देखील कांदा कमी प्रमाणात विक्रीला येत असल्याने १२० ते १३० रुपये प्रति किलो दराने चांगल्या प्रतीच्या कांदा खरेदी केला जात आहे. बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सर्वाधिक दर मिळत आहे, किरकोळ बाजारात मात्र त्याचा फायदा किरकोळ विक्रेते लाल कांदा महागड्या दराने ग्राहकांच्या माथी मारत आहे. बुधवारी (ता.४) पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा साडे अकरा हजार रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात आले.नाशिक, नगर, पुणे आणि सोलापुरी जिल्ह्यात सध्या आवक कमी होत असल्याने दरात वाढ केली आहे.बुधवारी पिंपळगाव बसवत येथील बाजार समितीमध्ये ११ हजार ५५१ रुपये प्रति क्विंटल दर उन्हाळा कांद्याला तर लाल कांद्याला ९ हजार ८०० रुपये दर मिळाला होता. 

लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात 


उन्हाळा कांदा सध्या फक्त नाशिक जिल्ह्यात अल्प प्रमाणात येत असून लाल कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. तरीही मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात तेजी कायम आहे. नाशिक, मुंबई, दिल्ली या शहरामध्ये कांदा प्रथमच शंभर रुपयांहून अधिक दराने विक्री होत  असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.हाॅटेलचालक आणि ग्राहकांमध्ये वादावादी

कांदा ८० ते १२०-रुपये प्रति किलोने खरेदी करावा लागत असल्याने खरेदी परवडत करीत नाही. हॉटेल व्यावसायिक कांद्याऐवजी कोबी, मुळा आणि काकडी खाण्यासाठी ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यामध्ये भांडणे होत  असल्याचे पहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...