आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात उंच मूर्ती पाहण्यासाठी व्हा सज्ज, सुरू झाली \'स्टॅच्यू ऑफ युनिटी\'साठी ऑनलाइन बुकिंग, मात्र काही लोक अजूनही नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी 31 ऑक्टोबर रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये लोहपुरुष पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे अनावरण करणार आहेत. 182 मीटर ऊंच असलेली पटेल यांची ही मूर्ती नर्मदेच्या धरणावर तयार आहे. रिपोर्टनुसार 3 नोव्हेंबरपासून सामान्य नागरिकांसाठी हे समारक खुले केले जाणार आहे. त्यासाठी तिकिटांचे ऑनलाइन बुकिंगदेखिल सुरू झाले आहे. मोदी सरकार मोठा गाजावाजा करत याचा प्रचार करत असले तरी, काही लोक असे आहेत, ज्यांना या मूर्तीबाबत आक्षेप आहे. त्यांनी मोदींना खुले पत्र लिहित विरोध दर्शवला आहे. 


22 गांवांच्या नागरिकांचे मोदींना पत्र 
- सरदार सरोवर डॅमवर मूर्ती तयार करण्यासाठी आसपास मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे 22 गावातील लोक प्रचंड नाराज आहेत. 
- या लोकांच्या मते, जर पटेल आज जीवंत असले तर या कामासाठी झालेली तोडफोड पाहून ते रडले असते. 
- गावकऱ्यांनी पत्र लिहून मोदींना, मूर्तीच्या अनावरणासाठी आल्यावर त्यांचे स्वागत केले जाणार नसल्याचे सांगितले आहे. 
- मीडिया रिपोर्टनुसार, या पत्रात असे लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला हे सांगताना अत्यंत वाईट वाटत आहे की, 31 ऑक्टोबरला जेव्हा तुम्ही अहमदाबादला याल तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करणार नाही. तुम्ही आमंत्रित पाहुण्याप्रमाणे नक्की या पण तुमचे स्वागत होणार नाही. 


अशी करा ऑनलाइन बुकींग 
स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी तिकिटाचे ऑनलाइन बुकींग करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला https://www.statueofunity.in/ पर ऑनलाइन टिकट सेगमेंटमध्ये जाऊन तिकिट बूक करावे लागेल. 


भूकंप-वादळातही डगमगणार नाही 
- रिश्टर स्केलवर 6.5 एवढ्या तीव्रतेचा भूकंप आणि ताशी 220 किमी वेगाच्या वादळाचाही पुतळ्यावर परिणाम होणार नाही. 
- अवघ्या 33 महिन्यांत पुतळा तयार कऱण्यात आला आहे. चीनच्या स्प्रिंग टेंपल बुद्धसाठी 11 वर्षांचा कालावधी लागला होता.  
- याची उंचीही फक्त 153 मीटर आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर आहे. 
- न्यूयॉर्कच्या स्टैच्यू ऑफ लिबर्टीची उंचीही यापेक्षा अर्धीच आहे. 
- स्टॅच्यू ऑफ युनिटी 2,989 कोटींच्या खर्चातून तयार करण्यात आला आहे. 
- नर्मदा नदीच्या धरणावर तयार करण्यात आलेली ही मूर्ती सात किलोमीटर दुरूनही दिसू लागते. 
- स्टॅच्यूमध्ये लावलेल्या लिफ्टद्वारे लोकांना सरदार यांच्या हृदयापर्यंत जाता येईल. त्याठिकाणी एक गॅलरी तयार करण्यात आली आहे. 
- गॅलरीतून सरदार सरोवर धरणाशिवाय नर्मदेच्या 17 किमी लांब किनाऱ्यावर पसलेल्या फुलांच्या बागेचा मनमोहक नजारा पाहायला मिळेल. 

 

बातम्या आणखी आहेत...