आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाॅलिसीच्या बहाण्याने अाॅनलाइन गंडा, परताव्याचे अामिष दाखवून लुबाडणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - "तुमच्या जुन्या विमा पाॅलिसी बंद झाल्या असून तुम्हाला या पाॅलिसीचे व्याज व बाेनसचे पैसे हवे असतील तर काही नवीन पाॅलिसी घ्यावा लागतील. त्या न घेतल्यास पैसे परत मिळणार नाहीत,' असा संदेश देणारे फाेन सध्या अनेकांना येत अाहेत. अापली पाॅलिसी बंद हाेऊन पैसे बुडीत खात्यात जाऊ नयेत, म्हणून संबंधित व्यक्ती फाेनची खातरजमा न करता सर्व माहिती संबंधितास तत्काळ पुरवतात आणि त्याआधारे मग कोट्यवधींचा गंडा घातला जातो. अशा प्रकारचे अनेक गुन्हे सध्या घडत असून फसवणूक होणाऱ्यांत ज्येष्ठांची संख्या अधिक अाहे. 

पुणे शहरात मागील महिनाभरात सायबर क्राइम शाखेकडे आलेल्या तीन तक्रारींतून साडेचार काेटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला अाहे. एका ८२ वर्षीय महिलेस एकाने आपण रिलायन्स विमा पाॅलिसी कार्यालयातून बाेलत असल्याचे सांगत तुमची पाॅलिसी बंद हाेण्याच्या मार्गावर असून ती पुढे चालू ठेवण्यासाठी ठराविक रक्कम भरा, असे सांगितले. त्याच्या सांगण्याला बळी पडत संबंधित महिलेला २०१२ पासून वेळाेवेळी विविध बँक खात्यांत सुमारे पावणेदाेन काेटींची फसवणूक करण्यास भाग पाडण्यात अाले. दुसऱ्या घटनेत मुलांपासून अलिप्त राहत असलेल्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठासोबतही असाच प्रकार घडला. "तुमची विमा पाॅलिसी बंद झाली असून तुम्ही ती पुनर्जीवित न केल्यास तुमचे पैसे बुडतील. ती पूर्ववत केल्यास पुढील काळात जादा पैसे मिळतील,' असे सांगत त्यांच्याकडून सव्वा काेटी रुपये उकळण्यात आले. तिसऱ्या घटनेत व्यवस्थापन सल्लागार म्हणून लिमिटेड कंपन्यांत भरती आणि गव्हर्नमेंट लायझनिंगचे काम करणाऱ्या ६६ वर्षीय व्यक्तीसही जुन्या पाॅलिसीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे ५५ लाखांची फसवण्यात आले. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना भामट्यांकडून लक्ष्य केले जात असून विमा पाॅलिसीच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याचा नवीन फंडा वापरला जाऊ लागला अाहे. 

 

दाेन वर्षांत पुण्यात विमा पाॅलिसीचे ८८ गुन्हे : विमा पाॅलिसीच्या बहाण्याने पुण्यात २०१७ मध्ये ३१ गुन्ह्यांत १ काेटी ४९ लाख ४७ हजारांची फसवणूक करण्यात आली, तर यंदा अाॅक्टाेबरपर्यंत सुमारे ५७ गुन्ह्यांची नोंद झाली असून सुमारे १ काेटी ४२ लाख ७५ हजारांच्या फसवणुकीचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पाषाण येथील व्यवस्थापन सल्लागाराच्या ५५ लाखांच्या फसवणूकप्रकरणी पाेलिसांनी नुकतीच मुंबर्इतून जावेद जलाल शेख (रा. घाटकाेपर) यास अटक केली अाहे. पीडिताला २४ वेगवेगळ्या लोकांनी फोन केल्याचे तपासातून उघड झाले आहे. त्यामुळे अशी फसवणूक करणारे देशभरात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवत तपास सुरू केला आहे. 

 

नागरिकांनी सतर्क असणे गरजेचे : सायबर क्राइम सेलच्या वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राधिका फडके यांनी सांगितले की, नाेकरी, कर्ज, विमा पाॅलिसीच्या बहाण्याने फसवणुकीचे प्रकार वाढत असून नागरिकांनी काेणताही अार्थिक व्यवहार करताना समाेरील व्यक्तीची अथवा कंपनीची खातरजमा करणे अावश्यक अाहे. अापल्या बँक खात्याची अथवा पाॅलिसीची काेणतीही माहिती अनाेळखी व्यक्तीस न देणे अाणि काेणत्याही आमिषाला बळी न पडणे महत्त्वपूर्ण अाहे. विमा पाॅलिसीबाबत अधिकृत कंपनीच्या अधिकाऱ्यांसाेबत प्रत्यक्षरीत्या भेटून पाॅलिसीची सविस्तर माहिती वेळाेवेळी करून घेतली पाहिजे. अाॅनलाइन फसवणुकीचा प्रकार घडल्यास तक्रार द्यायला हवी. 

 

माेठ्या रकमेचे भामट्यांकडून आमिष 
पाषाण येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय व्यवस्थापन सल्लागारास अाॅक्टाेबर २०१२ पासून वेळावेळी विमा कंपनीतून बोलत असल्याचा संदर्भ देत फसवण्यात आले. जुन्या पॉलिसी बंद झाल्या असून त्या कायम सुरू ठेवण्यासाठी काही नव्या पॉलिसी घ्याव्या लागतील, असे दोन भामट्यांनी त्यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यास भाळून पीडिताने बिर्ला सन लाइफ, रिलायन्स व भारती एक्सा या कंपनीच्या पाॅलिसी घेतल्या. त्यानंतर वेळाेवेळी या विमा पाॅलिसींचे हप्ते म्हणून भामट्यांनी रक्कम घेतली. त्यानंतर आपली लाखो रुपयांची पे ऑर्डर तयार असल्याचे सांगत काही ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार पीडिताकडून वेळोवेळी ५५ लाख रुपये उकळण्यात आले. दरम्यान, पॉलिसीची रक्कम मोठी असल्याचे सांगून आयकराच्या नावाखालीही भामट्यांनी त्यांची लूट केली. 

बातम्या आणखी आहेत...