'ऑनलाइन गेम' बाजार होणार ११,८८० कोटींचा, '११ विकेट्स डॉट कॉम'च्या अधिकाऱ्यांचे मत

वृत्तसंस्था

Mar 22,2019 12:52:00 PM IST


नवी दिल्ली - इंटरनेट आणि आॅनलाइन गेम्समध्ये भारतात २५.३२ कोटी सक्रिय खेळाडू हे १६ ते ३० वर्षे वयोगटातील असून त्यांचे प्रमाण ८१ टक्के आहे. देशातील गेमिंग उद्योग ५,५४० कोटी रुपयांचा असून तो २०२३ पर्यंत ११,८८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचे मत या क्षेत्राचे अभ्यासक आणि '११ विकेट्स डॉट कॉम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मखारिया यांनी व्यक्त केले आहे.

यामुळे होतीये ऑनलाइन गेमिंगमध्ये झपाट्याने वाढ

गेमिंगच्या क्षेत्रामध्ये जी वृद्धी अनुभवाला येत आहे त्याची कारणे म्हणजे वेगवान इंटरनेट आणि उत्तम ऑनलाइन पेमेंटची सुविधा ही आहेत. यामुळे तसेच 'आर्टिफीशियल इंटेलिजन्स'मध्ये होत असलेली वृद्धी यामुळे ऑनलाइन गेमिंग झपाटय़ाने वाढत असल्याचेही मखारिया यांनी माध्यमांना सांगितले.

X
COMMENT