Home | Business | Business Special | online process to Update address in Adhar Card 2 options on UIDAI

आता व्हॅलीड प्रुफशिवाय अपडेट होणार आधार कार्डमधील पत्ता, जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

दिव्य मराठी | Update - May 15, 2019, 03:24 PM IST

सतत घर बदल्यामुळे अॅड्रेस अपडेट करणे आवश्यक

 • online process to Update address in Adhar Card 2 options on UIDAI

  नवी दिल्ली- भारतात आधार कार्ड आता सामान्य माणसांचे ओळपत्र झाले आहे. त्यामुळे शासकिय योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्डला पॅन कार्डसोबत जोडणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. काही लोकांना सतत आपले घर बदलावे लागते त्यामुळे आधार कार्डवर पत्ता अपडेट करायला मोठी अडचण येते. पण आधारसोबत आपला मोबाइल क्रमांक जोडलेला असेल तर पत्ता अपडेट करणे सोपे आहे. जर आपल्याला आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आता आनलाईन अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.


  घरबसल्या बदला पत्ता
  यासाठी आपल्याला सर्वात आधी, uidai.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल आणि Update your adress online वर क्लिक करून update Aadhar हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर आधार सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल नावाचा एक नवा टॅब उघडेल. या पोर्टलवर अॅड्रेस चेंज करण्याचे दोन पर्याय दिसतील.


  ऑप्शन 1 व्हॅलिड अॅड्रेस प्रुप
  सर्वात आधी, आपला आधार नंबर कॅप्चा आणि ओटीपीच्या साहाय्याने लॉगइन करा. त्यानंतर Update Address via Address Proof टॅबवर क्लिक करून त्यावर आपला नवा अॅड्रेस प्रुफ अपडेट करा आणि प्रिव्ह्यू करा. यात आपला नवा पत्ता लगेच दिसेल. नंतर खाली दिलेला चेकबॉक्सवर सेलेक्ट करा आणि सबमिट टॅबवर क्लिक करा. अॅड्रेस अपडेट केल्यानंतर पेजवर एक URN म्हणजे Update request Number जनरेट होईल. हा नंबर पुढील रेफरेंससाठी नोट करून घ्या. तसेच नव्या अॅड्रेससोबतच आपण पासपोर्ट, बॅंक स्टेटमेंट, राशन कार्ड, मतदान कार्ड अपडेट करू शकता.

 • online process to Update address in Adhar Card 2 options on UIDAI

  ऑप्शन 2 अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे
  जर आपल्याकडे व्हॅलिड अॅड्रेस प्रुफ नसेल तर UIDAI कडून मिळलेल्या अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे ऑनलाइन अॅड्रेस प्रुफ अपडेट करू शकता. आपण ज्या अॅड्रेससाठी UIDAI कडून व्हॅलिडेशन लेटर घ्यायचे असेल तो पत्ता आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र किंवा घरमालकाचा असावा. सोबतच त्यांची परवानगीसुद्धा गरजेची आहे. 

 • online process to Update address in Adhar Card 2 options on UIDAI

  असे करा अपडेट
  सर्वात आधी आपला आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP द्वारे लॉगइन करा. त्यानंतर यामध्ये UIDAIकडून मिळालेला सिक्रेट कोड टाका. नंतर प्रीव्ह्यूमध्ये अॅड्रेस पहा बघा आणि सबमिट करा. ही प्रोसेस पुर्ण केल्यावर एक URN क्रमांक जेनरेट होईल, तो आपण पुढे रेफरेंससाठी संभाळून ठेऊ शकता. 

Trending