आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन शाॅपिंग नावाखाली नकली, नादुरुस्त सामानाची विक्री; वेबसाइट्स‌ विराेधात तक्रारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अजमेरचे रहिवासी प्रकाश डेव्हिड यांनी फ्लिपकार्टवरून सॅमसंगचा माेबाइल खरेदी केला हाेता. या हँडसेटचे इंटरनेट एका महिन्यात बंद झाले. डेव्हिड यांनी सर्व्हिस सेंटर व कस्टमर केअरकडे तक्रार केली, मात्र उपयाेग झाला नाही. ग्राहक मंचाकडे तक्रार केली तेव्हा माेबाइलची किंमत व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई देण्याचे अादेश कंपनीला देण्यात अाले. 

अाॅनलाइन मागवलेले सामान खराब निघाल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. देशभरात अशा अनेक तक्रारी अाहेत. एका खटल्याची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच अाॅनलाइन विक्रेत्यांना अादेश दिले की, विक्री हाेणारे सामान डुप्लिकेट नसावे याची काळजी घ्यावी. 'भास्कर'ने देशभरातील अशा प्रकरणांची माहिती घेतली तेव्हा अाश्चर्यकारक गाेष्टी समाेर अाल्या. 

 

मुंबई ग्राहक मंचचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांच्या मते, अाॅनलाइन खरेदीत सर्वांची जबाबदारी निश्चित करायला हवी. काही तक्रारी अाल्या तर अाम्ही फक्त विक्री सुविधा देणारे अाहाेत, असे सांगून अाॅनलाइन कंपनी हात वर करू शकत नाही. ई-काॅमर्सचा विस्तार पाहता याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर हाेणे अावश्यक अाहे. मार्केट रिसर्च फर्म रेडसीरच्या माहितीनुसार, देशातील ई-काॅमर्स इंडस्ट्रीला २०१७ मध्ये केवळ ग्राहकांकडून सामान परत केल्यामुळे ३.४ अब्ज काेटींचा फटका बसला अाहे. याच कारणामुळे स्नॅपडीलने मागील तीन वर्षांत ४५ हजारांहून अधिक विक्रेत्यांना अापल्या यादीतून काढून टाकले. अॅमेझाॅननेही नकली सामान विक्रेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे, व्हेलाॅसिटी एमअारद्वारे केलेल्या सर्व्हेतून हे लक्षात अाले की, अाॅनलाइन सामान खरेदी करणाऱ्या ३ पैकी एका ग्राहकाला मागील ६ महिन्यांत एक तरी वस्तू खराब मिळाली अाहे. तसेच या वर्षी अालेल्या एका सर्व्हेनुसार ३८ % लाेकांनी सांगितले की, त्यांना दरवर्षी ई-काॅमर्स साइटवरुन काही तरी खराब सामान मिळते. 

 

भाेपाळच्या ग्राहक मंचचे सदस्य सुनीलकुमार श्रीवास्तव सांगतात की, ग्राहक मंचात तक्रार करताना ग्राहकांनीही काळजी घ्यायला हवी. फाेटाे, खरेदीची पावती, अाॅर्डर नंबर, कंपनीकडून अालेला मेल किंवा एसएमएस, शक्य असेल तर डिलिव्हरी बाॅयचा नंबर सेव्ह करून ठेवावा. फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर भरपाईसाठी हे सर्व कामी येतील. बिहार राज्य ग्राहक अधिवक्ता संघाचे अध्यक्ष सत्येंद्रकुमार दुबे यांनी सांगितले की, पाटण्यातील एका व्यक्तीने लिबर्टी कंपनीचे बूट मागवले हाेते. मात्र वेबसाइटवर सांगितल्यानुसार दर्जेदार बूट मिळाले नाहीत. तक्रार केल्यानंतर कंपनीने एकाच्या बदल्यात बुटाचे दाेन जाेड पाठवून ग्राहकाला खुश केले. 

 

१४००० चे बूट, माेबाइल, म्युझिक सिस्टिम नकली 
- सर्व्हेनुसार, अाॅनलाइन खरेदीत तीनपैकी एकाला नकली सामान 
- दिल्ली उच्च न्यायालयाचेे अादेश; वेबसाइटने नकली सामान विकू नये 
- फसवणुकीचे हे जाळे देशभर पसरलेले : अाणखी काही प्रकरणे 

 

१. डास मारण्याचे यंत्र मागवले, मात्र एकही डास नाही मारला 
हरियाणातील पारस कांबाेज यांनी अाॅक्टाेबर महिन्यात 'नापताेल'वरून टी शर्ट मागवला हाेता, मात्र प्रत्यक्षात दुसराच शर्ट अाला. ग्राहकाने रिफंड मागितले तरी कंपनीने नकार दिला. दुसरे काहीतरी सामान घ्या, असे सांगितले. ६०० रुपये अजून देऊन डास मारण्याचे दाेन हजारांचे इलेक्ट्रिक यंत्र मागवले. त्याने एकही डास मेला नाही. तेही कंपनीने परत घेतले नाही. अखेर ग्राहक मंचात केस केली. 

 

२. १४ हजारांचे बूट निघाले नकली 
हरियाणातील हिस्सारचे मणींद्र यांनी 'मिंत्रा'वरून १३,९९९ रु. चे अदिदास बूट खरेदी केले. मात्र बुटावर नकली लाेगाे हाेता. ग्राहक मंचात तक्रार केली तर पैसे परत देण्याबराेबरच २५०० रुपये दंड कंपनीला ठाेठावला. 

 

३.माेबाइल फाेनच्या जागी पाकिटात साबणाचे तुकडे 
मुंबईतील वैभव कांबळे यांनी फ्लिपकार्टवरून १४ हजाराचे सॅमसंगचे २ माेबाइल खरेदी केले हाेते. अाॅर्डर दिल्यानंतर काही दिवसांनी घरी पार्सल अाले. ते उघडले तर त्यात साबणाचे तुकडे निघाले. वैभवने कंपनीकडे तक्रार केली. सुरुवातीला कंपनीने त्यांना माेबाइल देण्याचे अाश्वासन दिले, मात्र नंतर फाेनवर उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. अाता वैभवने कंपनीविराेधात पाेलिसांत तक्रार दाखल केली अाहे. 

 

४.शाेरूमनेही सांगितले ही बॅग नकली अाहे 
ग्वाल्हेरचे रहिवासी साेमेश शर्मा यांनी अाॅक्टाेबर महिन्यात लिनाेव्हा कंपनीची लॅपटाॅप बॅग फ्लिपकार्टवरून बुक केली. ६ महिन्यांनी पार्सल अाले. बॅग उघडून पाहिली तर ती नकली हाेती. साेमेशने लिनाेव्हा कंपनीच्या अाऊटलेटवर जाऊन चाैकशी केली तर त्यांनीही बॅग डुप्लिकेट असल्याचे सांगितले. क्वालिटीही चांगली नव्हती. त्यांनी कंपनीविराेधात वेबसाइटवर तक्रार केली, मात्र उपयाेग झाला नाही. अाता त्यांनी एसपी अाॅफिसमध्ये तक्रार केली. 

 

५.म्युझिक सिस्टिम मागवली, जुना दुरुस्त केलेला मिळाला 

मुंबईच्या मुलुंडचे रहिवासी धवल साेनी अायटी क्षेत्रात काम करतात. त्यांनी अॅमेझाॅन वेबसाइटवरून २५०० रुपयांची म्युझिक सिस्टिम मागवली. पार्सल घरी अाले तर वस्तू खराब हाेती. धवल यांनी सांगितले, म्युझिक सिस्टिम नवीन वाटत नव्हती. बहुतेक एखादी जुनी दुरुस्त करून पाठवली असावी. मी कस्टमर केअरला तक्रार केली, पाठपुरावाही केला. मात्र कंपनी सांगते अामचे प्राॅडक्ट चांगलेच अाहे. डिलिव्हरीदरम्यान त्यात बदल झाल्यास अॅमेझॉनची जबाबदारी नाही. धवल यांनी ग्राहक मंचात धाव घेतली अाहे. 

 

६. लॅपटाॅप मागवला एक, दुसरे माॅडेल घेण्याचा दिला सल्ला 
अाैरंगाबाद येथील कैलास गुप्ता यांनी 'ई-झाेन'वरून साेनी वाया कंपनीचा लॅपटाॅप ३३,००० रुपयात स्पेशल अाॅफरमध्ये बुक केला. त्यासाठी क्रेडिट कार्डने पेमेंट केले. पण ३० दिवसांत लॅपटाॅप अाला नाही. नंतर कंपनीकडे फाेन केला असता ते माॅडेल उपलब्ध नसल्याचे सांगितले. कंपनीने दुसऱ्या कंपनीचे माॅडेल घेण्याचा सल्ला दिला. मात्र गुप्ता यांनी नकार दिला. अाॅर्डर केलेल्या लॅपटाॅपची किमत ३८ हजार रुपये हाेती. त्याविराेधात ग्राहक मंचात तक्रार दाखल झाली अाहे. 

 

७. दाेनदा माेबाइल बदलला, तिसऱ्यांदा मात्र नकार दिला 
ग्वाल्हेरचे उत्कर्ष अग्रवाल यांनी २३ सप्टेंबरला स्नॅपडीलवर रेड-मी नाेट ३चा माेबाइल अाॅर्डर केला, ज्याची किमत ११,९९९ रुपये हाेती. २७ सप्टेंबर राेजी पार्सल घरी अाले. डेबिट कार्डने पेमेंट दिले. मात्र हा माेबाइल सुुरू झाला नाही. कंपनीकडे तक्रार करून माेबाइल परत पाठवला. कंपनीने ९ अाॅक्टाेबरला दुसरा पाठवला. मात्र ताे रेडमीचा नसून नाेकियाचा हाेता. पुन्हा तक्रार दिली. मात्र कंपनीच्या प्रतिनिधीने प्रतिसाद दिला नाही. नाेकियाचा माेबाइल परत घेण्यासही नकार दिला. त्याविराेधात ग्राहक मंचात तक्रार दाखल झाली. 

 

अॅड. अमित पुरुथी यांनी सांगितले, पाच लाखांपर्यंत फसवणुकीची तक्रार ग्राहक मंचात दाखल करण्यासाठी पूर्वी ४०० रुपये शुल्क द्यावे लागत असेल. नुकताच २६ अाॅक्टाेबर २०१८ राेजीच्या अादेशानुसार अाता हे शुल्क भरावे लागणार नाही. २० लाखांपर्यंत वस्तूच्या किमतीचा क्लेम जिल्हा ग्राहक मंचात, २० काेटी ते १ लाख राज्य ग्राहक मंचात व त्याहून अधिक रकमेची तक्रार असेल तर राष्ट्रीय ग्राहक मंचात तक्रार दाखल करू शकता. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...