आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन सर्व्हे:प्रदूषित दिल्लीत राहणे नकाे रे बाबा!, 12 हजार लोकांनी व्यक्त केली मते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या दिल्ली- एनसीअार येथील १२ हजार लाेकांची मते जाणून घेतली असता त्यापैकी ३५ टक्के लाेकांना अाता राजधानीत राहण्याएेवजी इतरत्र स्थलांतरित हाेण्याची इच्छा अाहे. सर्किल नामक स्थानिक एजन्सीमार्फत ५ ते १२ नाेव्हेंबरदरम्यान हा अाॅनलाइन सर्व्हे करण्यात अाला. या पाहणीत प्रदूषणाशी संबंधित तीन प्रश्न विचारण्यात अाले हाेते. वेगवेगळ्या प्रश्नांवर अाधारित या सर्व्हेत १२ हजार लाेकांनी २३ हजार उत्तरे दिली.


प्रदूषणाने धाेकादायक पातळीही अाेलांंडल्यामुळे यंदा सुप्रीम काेर्टाने दिल्लीत फक्त दाेनच तास ग्रीन फटाके वाजवण्याची परवानगी दिली हाेती. त्यामुळे यंदा दिवाळीदरम्यान प्रदूषणाचे प्रमाण काहीसे घटले हाेते. दरम्यान, १५ ते १६ नाेव्हेंबरदरम्यान शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी हाेऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला अाहे. दिल्लीत २ ते ४ नाेव्हेंबर व १३ ते १५ नाेव्हेंबरदरम्यान पाऊस व बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला हाेता. त्यानुसार मंगळवारी पाऊस पडला, तसेच थंड हवेमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी हाेण्याची शक्यता अाहे. 
दरम्यान, हवामान तज्ज्ञ  डाॅ. अार.के. जेनामनी यांच्या मते, २० नाेव्हेंबरपर्यंत दिल्लीत दाट धुक्याची झालर पसरू शकते.

 

तीन प्रश्नांवर अशी अाली उत्तरे

> 35 टक्के लाेक म्हणाले :  अशीच परिस्थिती राहिली तर दिल्ली साेडून इतरत्र स्थलांतरित व्हावे लागेल.

> 26 टक्के लाेक म्हणाले : इथेच राहू मात्र एअर प्युरिफायर, मास्कचा नियमित वापर करू. तसेच घराच्या परिसरात झाडांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करू.

> 12 टक्के लाेक म्हणाले :  ज्या काळात राजधानीत सर्वाधिक प्रदूषण हाेते, अाराेग्याला हानी पाेहाेचू शकते, फक्त त्याच काळात दिल्ली  -एनसीआर परिसराच्या बाहेर राहण्याची इच्छा.

 

दिल्ली- एनसीअार परिसरातील धाेकादायक प्रदूषणामुळे तुमच्या व कुटुंबीयांच्या अाराेग्यावर गेल्या तीन वर्षांत काय परिणाम झाला ?

> 53 % लोक म्हणाले- घरातील काेणाची ना काेणाची तरी प्रकृती बिघडली अाहे. मात्र, रुग्णालयात जाण्याएवढी गंभीर परिस्थिती नाही.

> 23% लोक म्हणाले- एका तरी  सदस्याला रुग्णालयात जावे लागले.

> % लोक म्हणाले- अनेकदा डॉक्टरकडे जावे लागले.

> 13 % लोक म्हणाले- अजून प्रदूषणाचा परिणाम नाही.

 

प्रदूषित हवेपासून बचाव कसा

- 56 लाेेक म्हणाले- प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी अाम्ही मास्क वापरताे. प्युरिफायरचाही वापर करताे.

- 21 लाेेक म्हणाले- प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी अाम्ही मास्क वापरताे. प्युरिफायरचाही वापर करताे.

 

बातम्या आणखी आहेत...