आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत हायप्रोफाईल 18 प्लस ब्युटी टेंपलवर धाड: वेबसाइटवर टाकले होते तरुणीचे फोटो आणि रेट कार्ड, अश्लील मेन्यु कार्डही सापडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांच्यासोबत सुटका करण्यात आलेल्या तरुणी - Divya Marathi
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांच्यासोबत सुटका करण्यात आलेल्या तरुणी

नवी दिल्ली - दिल्लीतील बुराडी परिसरात स्पाच्या नावे सुरू असलेल्या ऑनलाइन हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. बुराडी परिसरात 18 प्लस ब्युटी टेंपल नावाच्या एका स्पामध्ये ऑनलाइन वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या मदतीने धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.

अशी केली कारवाई...
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांच्याकडे ऑनलाइन सेक्स रॅकेटच्या वेबसाइटची तक्रार आली होती. त्या वेबसाइटवर तरुणींचे फोटो आणि चक्क रेट कार्ड सुद्धा टाकण्यात आले होते. मालिवाल यांनी यासंदर्भातील तक्रार दिल्ली पोलिसांत केली आणि एक सापळा रचण्यात आला. यामध्ये एक पोलिस अधिकारी आणि इतर कर्मचारी कस्टमर बनून बुराडी येथील 18 प्लस ब्युटी टेंपल स्पामध्ये पोहोचले. या ठिकाणी त्यांनी तरुणींचे फोटो आणि रेट कार्ड स्क्रीनवर दाखवण्यात आले. चर्चा सुरू असतानाच ठरल्याप्रमाणे स्वाती मालिवाल, महिला आयोगाच्या सदस्य आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले.

अश्लील मेन्यु कार्ड देखील सापडले...
धाड टाकल्यानंतर महिला आयोग आणि पोलिसांनी स्पा सेंटरचे निरीक्षण केले. त्यामध्ये तळघर आणि छुप्या तसेच छोट्या-छोट्या खोल्या सापडल्या. प्रत्येक खोलीत एक बेड होते. तसेच बटनावर नियंत्रित असलेले लोखंडी दार सुद्धा होते. खोल्यांमध्ये पोलिसांना काही अश्लील मेन्यु कार्ड सापडले. त्यामध्ये सर्वच प्रकारच्या सेक्स सेवा देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्येक पोझिशनसाठी वेगळे चार्जेस आकारले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही देखील जप्त केले. या सेक्स रॅकेटच्या दिल्लीत इतर ठिकाणी सुद्धा शाखा असल्याची बाब चौकशीत समोर आली आहे. दरम्यान, स्पा सेंटरच्या व्यवस्थापक आणि मालकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...