आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्समध्ये फक्त २०% जंगल वाचले; सरकार आणत आहे कायदा, १० झाडे लावली तरच विद्यार्थ्यांना मिळेल पदवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनिला- पर्यावरणाचे जतन करण्यासाठी  फिलिपाइन्स सरकार एक अनोखा कायदा तयार करत आहे. या कायद्यानुसार शाळेपासून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १० झाडे लावणे बंधनकारक असून ती लावली तरच त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जर या नियमाची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तर दरवर्षी १७.५ कोटी झाडांची लागवड करता येऊ शकेल. फिलिपाइन्समध्ये सातत्याने जंगलांचा नाश होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. झाडे कापल्यामुळे गेल्या ८५ वर्षात येथील एकूण ७० टक्के वन क्षेत्र कमी होऊन केवळ २० % वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. फिलिपाइन्सच्या सिनेटने गेल्या काही दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या या विधेयकाला ‘ग्रॅज्युएशन लिगसी फॉर द एन्व्हायर्नमेंट अॅक्ट’ नाव दिले आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कायदातज्ज्ञांनी या विधेयकाला हवामान बदलाचा सामना करून पुन्हा हिरवाई ाणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. सिनेटचे प्रतिनिधी गॅरी अलेजानो यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकानुसार शिक्षण, उच्चशिक्षण विभागाबरोबरच कृषी विभाग तसेच सामान्य नागरिकांनाही या कायद्याचे पालन करावे लागेल. वृक्ष लागवडीसाठी सरकार योग्य जागा शोधत आहे. मोकळ्या वनक्षेत्रासह वारसा जमीन, सैन्याची जागा, शहर तसेच ग्रामीण भागातही झाडे लावू शकतात. सर्व सरकारी संस्थांवर झाडांच्या योग्य देखभालीची जबाबदारी असेल. या संस्था विद्यार्थ्यांना झाडे उपलब्ध करून देतील. फिलिपाइन्समध्ये दरवर्षी १.२ कोटी विद्यार्थी पूर्व प्राथमिक, ५० लाख विद्यार्थी माध्यमिक शाळेत प्रवेश घेतात आणि ५ लाख विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडतात असे गॅरी अलेजानो यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी दरवर्षी १०-१० झाडे लावली तर दरवर्षी १७.५ कोटी  वृक्ष लागवड होईल. पर्यावरण रक्षणासाठी हे महत्त्वाचे पाऊल असेल असेही अलेजानो म्हणाले.

 

क्र.    देश        वन क्षेत्र
१    रशिया      45.40%
२    ब्राझिल     56.10%
३    कॅनडा       31.06%
४  अमेरिका     30.84%
५    चीन         18.21%
८    भारत       23.68%