आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात उरला केवळ २२ टक्के पाणीसाठा; २ महिन्यांत दहा टक्के घट, १६ पैकी दहा मध्यम प्रकल्प कोरडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात पाच ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकल्पांत केवळ ३२ टक्के इतका पाणी साठा होता. मात्र, दोन महिन्यांत मराठवाड्यातील पाणी साठ्यात दहा टक्के घट झाली असून केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात पाणीटंचाई आणखी तीव्र होणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील लघु प्रकल्पांत केवळ १४ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यात ५ ऑक्टोबर रोजी ८६४ प्रकल्पांत २६२८ दलघमी इतका पाणी साठा होता, तर डिसेंबर महिन्यात हाच पाणी साठा १८२८ दलघमी इतका शिल्लक आहे. दोन महिन्यांत मराठवाड्यातल्या पाणी साठ्यात २८ टीएमसी पाण्याची घट झाली आहे. 

 

जायकवाडीत उरला २७ टक्के पाणी साठा 

जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडल्यामुळे साडेचार टीएमसी पाण्याची आवक आली होती. त्यामुळे एक पाणी पाळी देणे शक्य झाले होते. सध्या जायकवाडीत ५८५ दलघमी पाणी साठा असून हे प्रमाण २७ टक्के आहे, तर येलदरी धरणात ६९ दलघमी पाणी साठा असून हे प्रमाण ०९ टक्के इतके आहे, तर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ५३४ दलघमी पाणी साठा असून हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. तर निम्न तेरणा २२ टक्के, दुधना धरणात १४ टक्के, तर सिनाकोळेगाव, माजलगाव, मांजरा प्रकल्पात शून्य टक्के पाणी साठा आहे. 

 

जिल्ह्यातले १६ पैकी दहा मध्यम प्रकल्प कोरडे 
औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प असून त्यापैकी दहा प्रकल्प कोरडे पडले आहेत. जिल्ह्यात २०५ दलघमी प्रकल्पीय क्षमता असताना केवळ १३ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये लहुकी, गिरजा, वाकोद, अजिंठा अंधारी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव, हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर सुखना ८ टक्के, अंबाडी ४ टक्के, गडदगड ७९, पूर्णा नेवपूर ७५ टक्के, अंजना पळशी ६ टक्के इतका पाणी साठा आहे. तर ९३ लघु प्रकल्पांत केवळ ३३ दलघमी पाणीसाठा असून केवळ १८ टक्के पाणी साठा आहे. तर अकरा मोठ्या प्रकल्पांत १३३३ दलघमी इतका पाणी साठा असून २५.९३ टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहे. तर गोदावरी नदीवरील ९ बंधाऱ्यांत ९४ दलघमी पाणी साठा असून ४४ टक्के इतका पाणी साठा झाला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...