आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षी २०० कोटींची कमाई करणारे फक्त ३ चित्रपट, यंदा १० महिन्यांतच पाच चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशात अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी, बॉलीवुडवर याचा परिणाम झालेला नाही. २०१९ च्या चित्रपटांची कमाई गेल्यावर्षीपेक्षा खूप जास्त आहे. यावर्षी सुरुवातीच्या १० महिन्यातच ५ चित्रपटांनी २०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर गेल्या वर्षी पूर्ण १२ महिन्यांमध्ये के‌वळ तीन चित्रपटांनी २०० कोटींचा आकडा पार केला होता. १०० कोटी क्लबमध्ये यंदा १० महिन्यात १३ चित्रपटांनी प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी १२ महिन्यांमध्ये १३ चित्रपटांनी १०० कोटींची कमाई केली होती. वर्ष समाप्त होण्यासाठी अजूनही दिड महिना बाकी आहे. कमाईच्या आधारावर यावर्षी शाहिद कपूरचा कंबीर सिंह चित्रपट सर्वात यशस्वी ठरला आहे.

असे कमी- जास्त झाले २०० कोटी क्लबचे चित्रपट
वर्ष चित्रपट कमाई (कोटीत)
2009 - 01 - 202.95
2013 - 03 - 756.32
2014 - 03 - 775.65
2015 - 02 - 530.05
2016 - 02 - 687.83
2017 - 03 - 1055.84
2018 03 884.99
2019 - 05 - 1183.56

२०१८ चे २०० कोटी क्लबमधील चित्रपट
> संजू 29 जून Rs.342.53 7 दिवसात
> पद्मावत 25 जानेवारी Rs.302.15 11 दिवसात
> सिम्बा 28 डिसेंबर Rs.240.31 12 दिवसात

यावर्षी या क्लबमध्ये ५ चित्रपट
> कबीर सिंह 21 जून Rs.278.24 13 दिवसात
> उरी 11 जानेवारी Rs.245.36 28 दिवसात
> वॉर 2 ऑक्टोबर Rs.228.55 7 दिवसात
> भारत 5 जून Rs.211.07 14 दिवसात
> मिशन मंगल 15 ऑगस्ट Rs.202.75 29 दिवसात


200 कोटी क्लबमध्ये दिग्दर्शकांमध्ये अली अब्बास, रोहित शेट्टी व राजकुमार हिरानी पुढे आहेत. त्यांचे ३-३ चित्रपट यामध्ये आहेत. स्रोत: सर्व आकडे बॉलीवुड हंगामा डाॅट काॅम