आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या डाटाचा दुरुपयोग होण्याची चिंता केवळ ३८ टक्के भारतीयांना, हा आकडा इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सतत डाटा चोरीच्या बातम्या येत आहेत. जगभरात अशा डाटा चोरीबाबत किंवा त्याचा दुरुपयोग होईल म्हणून सर्वाधिक चिंता करणारे लोक स्पेनमध्ये आहेत. डाटा रिसर्च कंपनी स्टेटिडाने नुकताच याबाबत एक सर्व्हे केला आहे. यानुसार, स्पेनमध्ये सर्वाधिक म्हणजे ६३ टक्के लोक आपल्या डाटा चोरीबाबत चिंतीत असून भारतात ही संख्या सर्वात कमी म्हणजे ३८ टक्के आहे.


मेक्सिकोमध्ये ५९ टक्के लोक याची चिंता करतात.  हा देश जगात दुसऱ्या स्थानावर आहे. तर, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सुमारे ४० टक्के लोक या चिंतेने ग्रासलेले असतात. चीनमध्ये अशी चिंता करणाऱ्या लोकांची संख्या ३९ टक्के असल्याचे हा सर्व्हे सांगतो. स्टेटिडाने २५ लोकांशी चर्चा करून हा सर्व्हे केला असून यानुसार, डाटाचा वाढता वापर आणि त्याची रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेता आता लोक अतिशय जागरुक होत चालले आहेत. अनेक लोक तर यामुळे चिंतेत असतात की काही कंपन्या आपल्या ग्राहकांचा डाटा जमा करत आहेत. फेसबुक आणि गुगल तर आपल्या बहुतांश ग्राहकांची माहिती सहजपणे मिळवू शकतो आणि त्याचे विश्लेषण करण्याची क्षमताही गुगलमध्ये आहे. याचा लाभ जाहिरातीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या विश्लेषणाच्या माध्यमातून अनेक कंपन्या जाहिरात कंपन्यांना टार्गेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. यासाठी अशा या कंपन्या ग्राहकांच्या खासगी माहितीचाही अत्यंत खुबीने वापर करतात. याची माहिती बहुतांश ग्राहकाना नसते.

 

जगभरात ४ अब्ज ३९ कोटींहून अधिक इंटरनेट युजर्स, ३ अब्ज सोशल मीडियावर

जगात सध्या ४ अब्ज ३९ कोटींहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. यातील ३ अब्ज ४८ कोटी लोक सोशल मीडियावर सक्रिय अाहेत. एकट्या भारतात गूगलचे ३३.७ कोटी युजर्स /असून ३० कोटीहून अधिक लोक फेसबुकचा वापर करतात. मार्केट रिसर्च कंपनी इमार्केटरनुसार, या वर्षी भारतात स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ३३.७ कोटी होईल. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांशीपेक्षा अधिक असेल.