आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात 24 उच्च न्यायालयांत केवळ 73 महिला न्यायमूर्ती; संसदीय समितीची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या संसदीय समितीने दिलेल्या माहितीत देशातील २४ उच्च न्यायालयांतील ६७० न्यायमूर्तींमध्ये केवळ ७३ महिला असल्याचे स्पष्ट केले आहे. हा आकडा २३ मार्च २०१८ पर्यंतचा आहे. सरकारने तेलंगण उच्च न्यायालयाची आकडेवारी दिली नाही. हे उच्च न्यायालय या महिन्यात स्थापन झाले आहे. सरकारनुसार, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची ४०९ पदे रिक्त आहेत. मंजूर पदांची संख्या १०७९ आहे. संसदीय समितीने न्यायालयातील महिला व वंचित वर्गातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी काय केले जात आहे, अशी विचारणा केली होती. कायदा मंत्रालयाने हायकाेर्ट मुख्य न्यायमूर्तींना केलेल्या सूचनेत नियुक्तीत एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...