आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/मुंबई : ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी १५ जानेवारी २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे. प्रश्न आहे की, हे पुढील वर्षापासून शक्य आहे का? देशात सुमारे तीन लाख ज्वेलर्स आहेत, तर हॉलमार्किंगसाठी नोंदणीसाठी केवळ २६ हजार ज्वेलर्सनेही केली आहे. तसेच देशात हॉलमार्किंग केंद्र ८७७ आहेत. हॉलमार्किंगचे काम ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) करेल. उपसंचालक, हॉलमार्किंग एचजेएस पसरिचा सांगतात की, १५ जानेवारी २०२१ नंतर १४, १८ व २२ कॅरेटचे दागिने विकले जातील.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, निर्माते, हॉलमार्किंग केंद्र व ज्वेलर्स या तिघांची जबाबदारी निश्चित करायला हवी. हॉलमार्किंग केंद्रांची संख्या खूप कमी आहे.
५०% हाॅलमार्किंगच, या ११ प्रश्नांमधून सर्व समजून घ्या
१. दरवर्षी किती दागिने विकले जातात.
बीअायएसच्या नुसार देशात सध्या ८०० टनपेक्षा जास्त सोन्याचा वार्षिक खप आहे. त्यापैकी ८०% घरगुती दागिने बनवण्यात वापरले जाते. १५ टक्के गुंतवणुकीसाठी व पाच टक्के उद्योगात वापरले जाते.
२. यात हॉलमार्क दागिने किती?
सध्या देशात एकूण दागिन्यांपैकी सुमारे ५०% हॉलमार्क होतात. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ४.३९ कोटी दागिन्यांची हॉलमार्किंग केली होती.
३. देशात हॉलमार्क केंद्रं किती आहेत?
देशात ७०० पेक्षा जास्त जिल्ह्यांपैकी २३४ मध्ये सुमारे ८७७ हॉलमार्क केंद्रं आहेत.
४. कोणत्या राज्यांमध्ये एकही केंद्र नाही?
ईशान्येतील सहा राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकही हॉलमार्क केंद्र नाही, तर सर्वाधिक १२३ केंद्रे महाराष्ट्र आणि १०२ पश्चिम बंगालमध्ये आहेत.
५. किती ज्वेलर्स अाहेत?
देशात सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त ज्वेलर्स असतील. बीआयएसनुसार २६ हजारांपेक्षा जास्त ज्वेलर्सनी आतापर्यंत हॉलमार्कसाठी नोंदणी केली आहे.
६. २०२१ मध्ये कोणते बदल होतील?
७. आमच्या सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होईल?
हॉलमार्किंगसाठी प्रत्येक दागिन्याला ३५ रुपये लागतील. यामुळे ग्राहकांवर किरकोळ परिणाम होईल.
८. विना हॉलमार्क ज्वेलरी विकल्यास?
१५ जानेवारी २०२१ नंतर जो ज्वेलर्स विकेल त्याचा परवाना रद्द करणे, एक लाख रुपयांचा दंड व कैदेची तरतूद असेल.
९. आधीपासून असलेल्या सोन्याचे काय?
एखाद्याकडे आधीपासून असलेल्या विना हॉलमार्क दागिन्यावर परिणाम होणार नाही. ते घालता येईल आणि दुकानदाराला विकताही येईल. मात्र, विकत घेताना हॉलमार्क दागिनेच मिळतील.
१०. कोणते दागिने जास्त विकले जातात?
देशात सर्वाधिक २२ कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातात. माहितीनुसार ७०% दागिने २२ कॅरेटचे बनतात. १५ जानेवारी २०२१ नंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग अनिवार्य असेल.
११. सर्वच दागिने हॉलमार्क असतील?
नाही, दोन ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या दागिन्यांना सूट असेल. २४ कॅरेटची नाणी आणि बिस्कीटसाठी हॉलमार्किंगची आवश्यकता नसेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.