आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहाने निर्माण होणाऱ्या प्रयोगांनाच यश मिळते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज कोण आहे? माझ्या मनात हा विचार येत होता, जेव्हा मी बुधवारी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या दरम्यान टी-२० क्रिकेट सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला निघालो होतो. मी जवळजवळ ५० वर्षांपासून क्रिकेटचे सामने पाहतो. माझ्यासाठी सर्वात महान खेळाडू तो आहे ज्याने सांगितले की शाळेत जायला लागू नये म्हणून मी क्रिकेट खेळू लागलो. माझ्यासाठी आकडे महत्त्वाचे नाहीत तर परिस्थिती महत्त्वाची आहे ज्या परिस्थितीत खेळाडू खेळतो. या मुलाकडे शाळेत दोन पर्याय होते. एक होता तो फुटबॉल आणि दुसरा होता तो क्रिकेट. त्याने दुसरा पर्याय निवडला. कारण फुटबॉलमुळे त्यांना काही वेळच वर्गाच्या बाहेर राहावे लागत होते. पण क्रिकेटमुळे त्याला पूर्ण दिवसभर बाहेर राहता येत होते. शिक्षकांचा मार खायला लागू नये म्हणून तो क्रिकेट खेळायला जायचा. जेव्हा तो क्रिकेट खेळायला गेला तेव्हा त्याला काही वरिष्ठ लोकांनी सांगितले की, तुझ्यात कौशल्य आहे. त्या वेळी त्याला वाटले की हे लोक चेष्टा करत आहेत. पण नंतर तो उत्कृष्ट गोलंदाजी करू लागला. त्या दिवसापासून त्याने खेळावर लक्ष देण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आता त्याचे ध्येय हे फक्त देशासाठी खेळणे इतकेच होते. स्वाभाविक आहे चांगला गोलंदाजी करणारा खेळाडू हा नेहमी शेवटचा फलंदाज असतो. पण त्याने जेव्हा पहिल्यांदा क्रिकेटमध्ये आगमन केले. त्या वेळी त्याने ११ नंबरला फलंदाजी केली. पण तो नशीबवान होता कारण त्या काळात त्याला प्रत्येक सामन्यात बॅटिंग करायची संधी मिळत होती. तो चांगला खेळ खेळत गेला. त्यामुळे हळूहळू त्याचा नंबर वर येत गेला. तर एक दिवस सर्वाच्या लक्षात आले हा फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजी पण करू शकतो. सामान्य पालकांसारखेच त्याच्या पालकांच्या अपेक्षा होत्या की त्यांच्या मुलाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. त्या वेळी त्याच्या आई-वडिलांना माहीतही नव्हते की क्रिकेटमध्ये काही करिअर होऊ शकते. पण या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांमध्ये गोंधळ घातला. या मुलाची दखल लंडन टाइम्सला पण घ्यावी लागली. त्यामध्ये लिहिलं होतं की, 'कपिलच्या टीमने जगात खळबळ माजवली.' मी त्याचा उत्साह कधीच विसरू शकत नाही. त्या दिवसांत भारताच्या फील्डिंगची चेष्टा केली जायची. त्या वेळी त्याने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की जो आपले १०० टक्के मैदानावर देऊ नाही शकत त्याला माझ्या टीममध्ये कोणतेही स्थान नसेल. त्यानंतर तो मुंबईत आला. इंग्लंडमध्ये कपिल खेळाडूंशी खूप सक्तीने वागला. त्यानंतर त्याने भारताच्या क्षेत्ररक्षणावर विशेष काम केले. कपिलने स्मितहास्य करत अत्यंत अवघड असा व्हिव्हियन रिचर्ड॰स याचा चेंडू झेलत त्याला बाद केले. अशी अगदी महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. नुकताच मी त्याच्याशी भेटून बोललो त्या वेळी त्याने सांगितले की, खेळासाठी सर्वात महत्त्वाचा उत्साह असतो. फंडा असा  उत्साहामुळेच अनेक नवीन प्रयोग होतात. उत्साह नसेल तर आपण काहीच मिळवू शकत नाही. मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर मॅनेजमेंट फंडा, एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in  

बातम्या आणखी आहेत...