आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे रेल्वे स्टेशन फक्त महिलाच सांभाळतात, संयुक्त राष्ट्राने केली प्रशंसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर(राजस्थान)- जयपूर ते दिल्ली मार्गात 'गांधीनगर' नावाचे एक छोटेशे स्वच्छ रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन देशातील इतर स्टेशन सारखेच आहे. पण एका विशिष्ट कारणामुळे जगात स्टेशनची एक वेगळीच ओळख बनली आहे.

 

प्रमुख मार्गातील असे पहिले स्टेशन आहे, जे फक्त महिलांद्वारे चालवले जाते. नुकतेच संयुक्त राष्ट्राने याची प्रशंसा करून महिलांचे सशक्तीकरणाच्या दिशेने ठेवलेले हे महत्वाचे पाऊल आहे असे म्हटले आहे. जयपूर-दिल्ली मार्गावर स्थित या स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवणाऱ्या गार्डपासून ते तिकिट चेकर आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या रूपात महिलांना पाहुन लोकांना आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो. तसेच, तिकिट खिडकीवरसुद्धा रेल्वेच्या पांढऱ्या गणवेशात गडद निळ्या रंगाचा कोट घातलेल्या महिला चोखपणे आपले काम करताना दिसतात.


महिला कर्मचाऱ्यामुळे प्रभावी झाली सुविधा 
संयुक्त राष्ट्राने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून विस्ताराने या स्टेशनविषयी माहिती देत म्हटले की, या स्टेशनवर 40 पेक्षा जास्त महिला कर्मचारी असून, त्या पुरूषापेक्षाही अधिक प्रभावीपणे आपली जबाबदारी पार पाडतात. यू.एनच्या मते, महिलांमुळे या स्टेशनवरील स्वच्छतेची व्यवस्था चांगली झाली असून येथील प्रशासन व्यवस्थासुद्धा योग्य पद्धतीने काम करत आहे.


दररोज 50 पेक्षा जास्त गाड्या आणि 7 हजारहून जास्त प्रवाशी प्रवास करतात
गांधीनगर स्टेशनवरून दररोज 50 पेक्षा जास्त गाड्या आणि 7 हजारहून अधिक प्रवाश्याचे आवक-जावक सुरू असते. मागील वर्षीच हे स्टेशन महिला कर्मचाऱ्यांच्या स्वाधिन केले गेले. तसेच यानंतर येथील पैशांची आवक वाढली आहे. गांधीनगर रेल्वे स्टेशनवर रेल्वे ओव्हर ब्रिज आहे तसेच, प्लॅटफॉर्म, डिजिटल नोटिस बोर्ड, सीसीटीवी आणि तिकीट खिडकी यारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मुंबईचे माटुंगा उपनगरचे स्टेशनसुद्धा महिलांदवारे सांभाळले जाते. पण गांधीनगर मुख्य लाइनचे पहिले असे रेल्वे स्टेशन आहे ज्याची संपुर्ण जबाबदारी महिला कर्मचारी पार पाडतात.