नागदा - मध्य प्रदेशात सध्या निवडणुकीची धूम सुरू आहे. उमेदवारांचा प्रचारही जोमात सुरू आहे. राजकीय पक्षाच्या आराेप- प्रत्यारोपांचे फड रंगत असताना लोकांचाही मतदानासाठी उत्साह दिसून येतो आहे. नागदा येथील दीपिका सोनीचे लग्न राजस्थानातील झालावाडच्या नितेशशी १९ नोव्हेंबरला पार पडले. दीपिकाने लग्नाआधीच पतीला मतदानास माहेरी जाऊ देणार असाल तरच लग्न करीन, अशी अट घातली होती. तिच्या पतीने व सासरच्या मंडळींनी होकार दिला. आता ती २८ नोव्हेंबरला मतदानास जात आहे.