आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना बदनाम केले तरच युतीची सत्ता येते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम : मी कोणत्याही बँकेचा सभासद, संचालक नाही. तरीही माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. पवारांची बदनामी केल्याशिवाय सेना-भाजपची सत्ता येणार नाही. यासाठीच मला निष्कारण गोवण्याचा प्रयत्न केला. या बँकेत विविध पक्षाचे ७० संचालक आहेत. मात्र यात चौकशी मात्र पवारांचीच होते. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या शपथपत्र देताना २ खटल्यांची माहिती दडवली. याबाबत मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

शेती व शेतकऱ्यांविषयी कसलीही जाण नसलेल्या सरकारने भूम, परांडा, वाशी तालुक्यात भयानक दुष्काळी स्थिती असताना काय केले, असा सवाल करत अशा नाकर्त्या सरकारला पुन्हा सत्तेत पाठवू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.