आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या महालाप्रमाणे दिसणा-या या तुरुंगात राहतो फक्त एक कैदी, मिळतात या सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जग हे रहस्यांनी भरलेले आहे. आपण जगात जिकडे गेलो तिकडे आपल्याला काहीना काही अद्भुत आणि रंजक काही तरी दिसत असते. भारताच्या गुजरात राज्याकडे पाहिले तर असेच काही दृष्य आपल्याला दिसेल. हे पाहिल्यानंतर आपण कंफ्यूज होऊ शकतो. समुद्र किना-यावर एक आलीशान बिल्डिंग दिसते. ही एखाद्या महालाप्रमाणे दिसते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हा महाल नाही तर एक तुरुंग आहे. 


- आम्ही दीव विषयी बोलत आहोत. केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळख असणा-या दीवच्या एका तुरुंगाची भव्यता पाहून तुम्ही चकीत व्हाल. प्राचिन काळात ही जागा पोर्तुगाल कॉलोनीमध्ये यायची. 
- जवळपास 475 वर्षे जुन्या या तुरुंगात फक्त एकच कैदी आहे. या कैद्याचे नाव दिपक कांजी आहे आणि त्याचे वय 30 वर्षे आहे. दिपक कांजीवर पत्नीला विष देऊन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. 
- तुरुंगात कांजी एकटाच राहतो यामुळे त्याच्या सुरक्षेत 5 शिपाई आणि 1 जेलर तैनात आहे. सर्वांची शिफ्ट तासांनुसार ठरवलेली असते. 

 

2013 मध्ये जेल बंद करण्याची घोषणा 
- 2013 मध्ये जेल बंद करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा येथे कैदी येणे बंद झाले. काही वर्षांपुर्वी ये 7 कैदी राहायचे. यामध्ये 2 महिलांचा समावेश होता. पण काही कारणांमुळे त्यामधील चौघांना गुजरातच्या अमरेली तुरुंगात हलवण्यात आले. तर 2 कैद्यांच्या शिक्षेचा काळ पुर्ण झाला. यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. यामुळे आता येते फक्त एक कैदी राहतो. 
- दीवच्या तुरुंगात ड्यूटी करणा-या शिपायाने मीडियासोबत बोलताना सांगितले की, एका कैद्यासाठी वेळ काढणे खुप अवघड होते. आकड्यांनुसार दमन आणि दीवमध्ये प्रत्येक कैद्यावर सरकारला 32 हजार रुपयांचा खर्च येतो. हा इतर राज्यांच्या तुलनेत खुप जास्त आहे. 
- ज्या बॅरकमध्ये दिपक राहतो. ते 20 कैद्यांसाठीचे बॅरक आहे. त्याच्या खाण्याचा बंदोबस्त शेजारच्या रेस्तरॉमध्ये केला आहे. तसेच त्याला तुरुंगात काही काळ दूरदर्शन आणि इतर आध्यात्मिक चॅनल पाहण्याची परवाणगी देण्यात आली आहे. त्याला तुरुंगामध्ये गुजराती वृत्तपत्र आणि मॅगझीनही दिल्या जातात. यासोबतच संध्याकाळी 4 ते 6 वाजता तो दोन शिपायांसोबत मोकळ्या हवेत फिरुही शकतो. 

बातम्या आणखी आहेत...