आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउना (गुजरात) / बैकुंठपूर (छत्तीसगड) - मंगळवारच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात गुजरात व छत्तीसगडमधील दोन मतदान केंद्रे चर्चेत राहिली. गुजरातच्या बाणेजमध्ये केवळ एका मतदारासाठी मतदान केंद्र स्थापन केले. छत्तीसगडच्या शेरडांड गावात केवळ चार मतदारांनी मतदान केले आणि अर्ध्या तासात १०० % मतदान झाले.
गुजरातच्या बाणेजमध्ये गीरच्या वनात महंत भरतदास वास्तव्यास आहेत. निवडणूक आयोगाने एकट्या मतदारासाठी मतदान केंद्र स्थापन केलेले हे गुजरातमधील नव्हे, तर देशातील एकमेव केंद्र आहे. भरतदास मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मतदान करण्यासाठी गेले. मतदान सुरू झाल्यानंतर साडेतीन तासांच्या आत जुनागड लोकसभा मतदारसंघाच्या या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले. भरतदास मतदान करताना पाहण्यासाठी देशातूनच नव्हे, तर विदेशातूनही पत्रकार आले होते. थेट वार्तांकनही केले. विशेष म्हणजे, बाणेजमध्ये एकच मतदान पडणार होते, मात्र निवडणूक आयोगाच्या स्टँडर्ड प्रक्रियेअंतर्गत ५० मतांचे अभिनय मतदानही झाले. भरतदास बापू गीरच्या वनात गेल्या २० वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्यासोबत एक नोकरही राहतो. त्याचे नाव बाजूच्याच गावातील मतदार यादीत आहे. गुजरातमध्ये ५१,८५१ मतदान केंद्रे स्थापन केला. त्यात बाणेजचे मतदान केंद्र सर्वात जास्त दुर्गम मानले जाते.
दुसऱ्या बाजूस भरतपूर-सोनहत विधानसभा मतदारसंघातील शेरडांड गाव आहे. येथे एकाच कुटुंबातील केवळ ४ सदस्य मतदार आहेत. मंगळवारी येथे ७.०० वाजता १००% मतदान झाले. येथे दोन कर्मचारी व ४ ग्रामीण मतदार मिळून ६ मते पडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.