आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे बाेलण्यासही कचरत असायचे, त्यांनीच बलाढ्य साम्राज्य नमवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२ अाॅक्टाेबर १८६९ राेजी पाेरबंदरच्या २२ खाेल्यांच्या ३ मजली हवेलीत माेहनदास गांधींचा जन्म झाला. ते इतके लाजाळू हाेते की, शाळा सुटताच घरी पळायचे. कारण, इतरांशी बाेलताना ते कचरत असत. जहाजाद्वारे ब्रिटनला जात असताना सहप्रवाशांसाेबत जेवण घेण्यासही ते हिचकिचत असत. त्यांचा जेथे जन्म झाला तेथे कीर्ती मंदिर उभारण्यात अाले अाहे. येथे बाैद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन, मुस्लिम अाणि हिंदूंचे प्रार्थनास्थळ अाहे. राेज सायंकाळी 'वैष्णव जन..' गायिले जाते.

ब्रिटन तेे द. अाफ्रिका 1888 ते 1915
दिव्य मराठी : १८८८ मध्ये गांधीजी लंडनच्या व्हिक्टाेरिया या अालिशान हाॅटेलमध्ये मुक्कामास हाेते. अाता ते हाॅटेल द ग्रँडमध्ये रूपांतरित झाले अाहे. त्या वेळी त्यांनी लिहिले हाेते,'जेव्हा मी व्हिक्टाेरिया हाॅटेलमधील दालने न्याहाळत हाेताे त्या वेळी वाटले की येथे सारे अायुष्य घालवू शकताे'. काही दिवसांनंतर ते वेस्ट किंगस्टनमध्ये राहावयास गेले. लंडनमध्ये बार हाॅलबाेन रेस्टाॅरंटमध्ये गेले तेव्हा मांस न खाल्ल्यामुळे मित्रांनी त्यांची चेष्टा केली हाेती. या प्रकारामुळे ते विचलित झाले नाहीत. नंतर ते व्हेजिटेरियन साेसायटीशी जाेडले गेले. त्यांचे अावडते शाकाहारी हाॅटेल दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नष्ट झाले हाेते. लंडनमध्ये त्यांनी ४ वर्षे मुक्काम केला. १९०९ मध्ये त्यांनी एका लेखात म्हटले की,'भारताबाहेर जर कुठे राहायचे असेल तर मी लंडनमध्ये राहणे पसंत करीन'. १९३१ मध्ये दुसऱ्या गाेलमेज परिषदेदरम्यान अापल्या अखेरच्या लंडन दाैऱ्यात गांधीजी टाॅवर हॅम्लेट्समध्ये मुक्कामास हाेते. या अाठवणीप्रीत्यर्थ या टाॅवर हॅम्लेट्सवर १९५४ मध्ये निळी पट्टी लावण्यात अाली हाेती. पहिल्यांदाच एका भारतीयास हा सन्मान मिळाला. १९८८ मध्ये ज्या घरात ते राहायचे ती वास्तू संरक्षित करण्यात अाली. २०१५ मध्ये पार्लमेंट स्क्वेअरवर डेव्हिड कॅमरून यांच्या हस्ते गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात अाले.

राखेतूनही झेपावणाऱ्या पक्ष्याच्या नावावर 'फीनिक्स' वसवले, १९८० च्या अागीत उद‌्ध्वस्त झाला अाश्रम, अाता येथे वस्ती, शाळा, संग्रहालय
दिव्य मराठी / प्रो. बी.एम. शर्मा : महात्मा गांधींनी अांदाेलनांचे संचालन करण्यासाठी संपूर्ण अायुष्यात एकूण ५ अाश्रमांची स्थापना केली. यापैकी पहिले दाेन अाश्रम दक्षिण अाफ्रिकेतील फीनिक्स सेटलमेंट अाणि टाॅलस्टाॅय फाॅर्म हाेत. नेटालमध्ये पिजांग नदी किनारी १०० एकरमध्ये फीनिक्स वस्तीची सुरुवात डिसेंबर १९०४ मध्ये केली हाेती. अांदाेलनांमुळे कारावासात गेलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना अाश्रय देण्यासाठी अाश्रमाची उभारणी करण्यात अाली हाेती. अापल्याच राखेतून पुन्हा झेप घेणाऱ्या फीनिक्स पक्ष्याच्या धर्तीवर या स्थळालादेखील अमरत्व देण्याचा गांधींचा प्रयत्न हाेता. १९५० मध्ये येथे शाळा सुरू झाली. १९७० मध्ये कस्तुरबा स्मृती विद्यालय नाव दिले गेले. त्यानंतर याचे व्यवस्थापन भारतीय विभाग अाणि फीनिक्स सेटलमेंट ट्रस्टने सांभाळले. अाता येथे ट्रस्टचे मेडिकल केअर सेंटर, वाचनालय अाणि संग्रहालय कार्यरत अाहे. १९८० मध्ये जनजातींमधील हिंसक संघर्षात संपूर्ण फीनिक्स वसाहत अागीत खाक झाली हाेती. त्यानंतर पुन्हा फीनिक्स काॅलनी उभारण्यात अाली. दुसरीकडे गांधीजी १९०९ मध्ये इंग्लंडहून द. अाफ्रिकेत परतले तेव्हा टाॅलस्टाॅय फार्म या संस्थेची स्थापना केली. सविनय कायदेभंग करणाऱ्यांना सामंजस्यपूर्ण जीवन जगण्याचे प्रशिक्षण देणे हा यामागचा हेतू हाेता. रशियन तत्त्ववेत्ते टाॅलस्टाॅय यांच्या सिद्धांतांचा गांधींवर प्रभाव हाेता. त्याचमुळे हा फार्म एकता, बलिदान अाणि शक्तीचे प्रतीक बनला. इथल्या भारतीय समुदायांनी गांधींच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी फार्मची मूळ वास्तू विकत घेतली, अाता ही वास्तू टाॅलस्टाॅय फार्म या नावाने अाेळखली जाते.


महात्म्याचे जेथेही वास्तव्य हाेते, ब्रिटनने त्या वारसास्थळांना अमरत्व बहाल केले
पहिला गांधी पु
तळा
शिल्पकार डेव्हिडसनला गांधी म्हणाले- तुम्ही मातीतून नायक घडवता
महात्मा गांधी १९३० ला लंडनमध्ये गेले. त्या वेळी अमेरिकी शिल्पकार डेव्हिडसन यांनी गांधींसमाेरच त्यांचा पहिला पुतळा बनवला. डेव्हिडसन काही छायाचित्रे घेऊन गांधींना भेटले. ते पाहून गांधी म्हणाले, मी पाहताेय की तुम्ही मातीतून नायक घडवत अाहात. गांधीजींचा चेहरा अतिशय गतिशील हाेता. जेव्हा ते बाेलत असत त्यांच्या चेहऱ्यात परिवर्तन हाेत असे. ज्या मातीवर मी काम करीत हाेताे, त्याकडे त्यांनी पाहिलेदेखील नाही. जेव्हा मी विश्रांतीच्या काळात त्यांच्याशी बाेलत असे त्या वेळी मला मनमिळाऊ व्यक्ती भेटली. यादरम्यान लाेक महात्म्याच्या भेटीसाठी येत असत. काही त्यांना निरर्थक प्रश्नही विचारत. एका व्यक्तीने तर 'महात्मा'चा अर्थ काय? असे विचारले त्या वेळी गांधीजी उत्तरलेे, महात्मा म्हणजे बिनमहत्त्वाची व्यक्ती.


चंपारण्य ते दांडीपर्यंत 1915 ते 1931
नीळ ते मिठापर्यंत अन्यायाविराेधात परिणामकारक लढा देणारी श
हरे
दांडी / चेतन पटेल
गांधीजी १० एप्रिल १९१७ राेजी चंपारण्यला पाेहाेचले. गांधीजी स्टेशनवर उतरलेच हाेते की त्यांना अटक करून काेर्टात हजर करण्यात अाले. न्यायाधीशांनी म्हटले,'अापण परत जाल तर खटला रद्द करू'. गांधीजी म्हणाले,'नीळ शेतीने त्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अालाे अाहे'. न्यायाधीशांना केस रद्दबातल करावी लागली. अशा पद्धतीने पहिल्या नागरी अाणि सविनय कायदेभंगाच्या अांदाेलनास सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारला झुकावे लागले. चंपारण्यमध्येच त्यांना बापू हे नामाभिधान मिळाले. गांधीजींना ज्या न्यायालयात हजर करण्यात अाले तेथे अाजही ४८ फूट उंच गांधी स्तंभ पाहायला मिळताे. हा स्तंभ या शहराची अाेळख अाहे. यानंतर गांधीजींनी देशभर प्रवास करून लाेकांना प्रेरित केले. १२ मार्च १९३० ला गांधीजींनी अहमदाबादच्या साबरमती अाश्रमापासून मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा सुरू केली. तेव्हा भारतीयांना मिठाचे उत्पादन घेण्याचा अधिकार नव्हता. त्याविराेधात यात्रेच्या निमित्ताने २४ दिवसांत ३८७ किमी प्रवास केला. सुरुवातीला ८० लाेकांना सुरू केलेल्या यात्रेत नंतर हजाराे लाेक सामील झाले. गांधी-अायर्विन कराराने या अांदाेलनाची सांगता झाली.


मुंबई ते दिल्लीपर्यंत 1942 ते 1948
अाॅगस्ट क्रांती मैदानातून दिला 'कराे या मराे'चा नारा, इथल्या कणाकणात क्रा
ंती
मुंबई / विनोद यादव
गांधीजींनी ८ अाॅगस्ट १९४२ राेजी मुंबईत इंग्रजांविरुद्ध भारत छाेडाे अांदाेलन पुकारले हाेते. काँग्रेस समितीच्या बैठकीत गांधीजी म्हणाले, अांदाेलनाचे मूळ अहिंसा अाहे. मैदानावर जमलेल्या जमावास उद्देशून त्यांनी 'कराे या मराे'चा नारा दिला. त्यांनी म्हटले, प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्याचा अधिकार अाहे. अाता प्रत्येक भारतीय, स्वत:ला स्वतंत्र मानण्यास अाणि अापला मार्गदर्शन निवडण्यास देखील तयार अाहे. याच भाषणासाेबत ९ अाॅगस्ट १९४२ राेजी भारत छाेडाे अांदाेलनाची सुरुवात झाली. मुंबईतील गाेवालिया टँक मैदानावरील गांधींच्या भाषणानंतर काही वेळाने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात अाली. या मैदानास अाता अाॅगस्ट क्रांती मैदान म्हणून अाेळखले जाते. स्वातंत्र्याेत्तर काळात हे मैदान लाेकशक्तीच्या चैतन्याचे प्रतीक अाणि विविध अांदाेलनांचा साक्षीदार बनले अाहे. गांधीजींना पहिल्यांदा येरवडा कारागृहात, नंतर पुण्यातील अागाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात अाले. कारागृहात गांधींनी २१ दिवस उपवास केला. या अहिंसक विराेधास घाबरून इंग्रजांनी १९४४ मध्ये त्यांची मुक्तता केली. भारत छाेडाे अांदाेलनादरम्यान देशभर निदर्शने झाली. अखेर इंग्रजांना हा देश साेडावा लागला.

बातम्या आणखी आहेत...