आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशासाठी तुम्हीच सक्षम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या संवत्सराची सुरुवात झालेली आहे. तेव्हा नवा संकल्प करा. जेव्हा सकाळी आपण उठतो, तेव्हा आजपासून आपण चांगले घ्यायचे की निकृष्ट दर्जाचे याचा निर्णय आपणासच करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला ताजेतवाने ठेवा आणि येत्या चोवीस तासांत आपला ताजेपणा आपणास चांगलाच पर्याय देऊन जाईल याचा विचार करा. जर नव्या काळात तुम्हाला सफलता मिळवायची असेल तर तुम्हीच सक्षम आहात, हा नवसंवत्सराचा संदेश आहे. तुमच्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणी यश मिळवून देणार नाही. हाच नवविचार तुमच्या गेलेल्या काळाला पुसून टाकेल आणि नव्याशी जोडेल.