हाताचे 5 शुभ / हाताचे 5 शुभ संकेत : एकही हातामध्ये असल्यास होऊ शकतो धनलाभ

Aug 08,2018 12:02:00 AM IST

ज्योतिषमधील सर्वात खास विद्या म्हणजे हस्तरेषा. हातावरील रेषा नि हाताची बनावट पाहून तसेच हातावरील वेगवेगळ्या चिन्हांच्या आधारे व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी बरीच माहिती समजू शकते. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीला हात पाहून त्याला धनलाभ होणार की नाही हे समजू शकते. येथे जाणून घ्या, धनलाभाशी संबंधित हाताचे काही योग...


लक्षात ठेवा : पुरुषांच्या डाव्या हाताचा आणि स्त्रियांच्या उजव्या हाताचा अभ्यास करावा.


# पहिला योग
एखाद्या व्यक्तीचा हात भारदस्त, बोटे कोमल आणि लाल दिसत असल्यास हा शुभ संकेत आहे. असा हात असणारे स्त्री-पुरुष यांना भाग्याची साथ मिळते. या लोकांना धन संबंधित कामामध्ये विशेष यश प्राप्त होते.


# दुसरा योग
हातावरील आयुष्य रेषा योग्य वर्तुळाकार, मस्तिष्क रेषा शुभ स्थितीमध्ये आणि त्रिकोणाचे चिन्ह तयार झाले असेल तर हा शुभ योग आहे. या तिन्ही लक्षणांच्या शुभ प्रभावाने व्यक्तीला भाग्याची साथ मिळते. अशा लोकांना वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. आयुष्य रेषा अंगठ्यापाशी वर्तुळाकार असते आणि याच्या प्रारंभिक स्थानापासून मस्तिष्क रेषा सुरु होते.


# तिसरा योग
मध्यमा म्हणजे मिडल फिंगरच्या खाली शनी पर्वत असतो. मनगटाजवळ मणिबंध असतो. मणिबंधापासून सुरु होऊन शनी पर्वताकडे जाणाऱ्या रेषेला भाग्य रेषा म्हणतात. ही रेषा एकदम स्पष्ट आणि मणिबंधापासून सुरु होऊन शनी पर्वतापर्यंत जात असल्यास हा एक शुभ संकेत आहे. यासोबतच भाग्य रेषेवर कोणतेही अशुभ चिन्ह नसल्यास व्यक्ती यश प्राप्त करतो. धनलाभाचे योग जुळून येतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन योग...

# चौथा योग हातावर मधल्या बोटाखाली शनी पर्वतावर दोन किंवा यापेक्षा जास्त उभ्या रेषा असल्यास व्यक्तीला धन आणि सुख प्राप्त होते.# पाचवा योग एखाद्या व्यक्तीच्या हातावर शनी पर्वत उंच आणि आयुष्य रेषा गोलाकार असेल, कुठूनही तुटलेली नसेल किंवा इतर रेषांनी कापलेली नसल्यास हा शुभ योग आहे. हातामध्ये इतर कोणताही दोष नसल्यास व्यक्ती भाग्यशाली मानला जातो.
X