आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांग, खेळाडू तसेच कलावंत विद्यार्थ्यांसाठी आता ओपन बोर्ड,शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शारीरिक क्षमतांमुळे शाळेत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तसेच कला- क्रीडा क्षेत्रात करिअर करत असताना शिक्षण प्रवाहापासून दूर जात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात मुक्त मंडळाची अर्थात अाेपन बाेर्ड स्थापण्याची घाेषणा साेमवारी शालेय शिक्षणमंत्री विनाेद तावडेंनी केली. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या स्पर्धा, कला कार्यक्रमांत सहभागी होताना किंवा त्यांचे शिक्षण घेताना शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करत परीक्षाही देता येणे शक्य हाेईल. १० जानेवारी राेजी अाेपन बाेर्डाची लिंक जाहीर करण्यात येणार आहे.


पाचवीपासून प्रवेश : या बाेर्डामुळे विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाण्याची गरज भासणार नाही. ते बहिःस्थ प्रवेश घेऊ शकतील. हा वेळ ते कला-क्रीडा गुणांच्या विकासासाठी देऊ शकतील. इयत्ता पाचवीपासून या बाेर्डात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. वयाच्या दहाव्या वर्षी पाचवीची, १३ व्या वर्षी अाठवीची व १५ व्या वर्षी दहावीची परीक्षा या बाेर्डाच्या माध्यमातून देता येईल. डिसेंबर व जून अशी वर्षातून दाेन वेळा परीक्षा घेतली जाईल.

 

अशी असेल प्रक्रिया

पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. त्यात ‘आम्ही पाल्याला घरी शिकवणार असून परीक्षा देण्याची संधी मिळावी’ असे लिहून द्यावे लागेल. तसेच पाल्य ज्या ठिकाणी क्रीडा वा कलेचे प्रशिक्षण घेत असेल तेथील शिक्षकांनीही याची माहिती द्यायची आहे. तसेच ज्या दिव्यांगांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण जाणार आहे त्यांना ओपन स्कूलद्वारे परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होईल.