Home | Business | Personal Finance | Open Zero Balance Account without 'KYC' at SBI Bank

SBI बँकेत 'KYC' न करता उघडा झिरो बॅलन्स अकाउंट; त्यासाठी करावे लागेल हे काम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:23 PM IST

आता SBI बँकेत 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येकाला झिरो बॅलन्स अकाउंट उघडता येणार आहे.

 • Open Zero Balance Account without 'KYC' at SBI Bank

  नवी दिल्ली- आता तुम्ही भारतीय स्टेट बँक (एसबीआय)मध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडू शकता. एसबीआय बँकेच्या नव्या नियमानुसार या अकाउंट उघडण्यासाठी 'KYC'ची आवश्यकता नसल्याने कागदपत्रांशिवाय हे अकाउंट खोलता येणार आहे. त्यासाठी खातेधारकाचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

  अकाउंट उघडण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता
  > एसबीआयमध्ये स्मॉल अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला बँक अधिकाऱ्याकडे सेल्फ अटेस्टेड फोटो, तुमची सही किंवा अंगठ्याचा ठसा द्यावा लागेल.

  अकाउंटमधील कमीत कमी बॅलन्स
  > तुम्ही हे अकाउंट झिरो बॅलन्सही ठेऊ शकता.

  या गोष्टींची घ्या काळजी
  > एसबीआय बँकेच्या अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत रक्कम ठेवता येते.
  > एका महिन्यात खातेधारक त्याच्या अकाउंटमधून 10,000 रुपयांचा व्यव्हार करु शकतो.
  > जर तुमच्या अकाउंटमध्ये 50,000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्ही पुढचे ट्रांजेक्शन 'KYC'ची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच करु शकता.
  > एका अहवालानुसार, या अकाउंटमधून खातेधारकाला एका महिन्यात 4 वेळा ट्रांजेक्शन करता येणार आहे.

Trending