आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघडतंय समृद्धीचं महाद्वार; इगतपुरीत साकारत आहेत ७.८ किमीचे दोन महाबोगदे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नागपूर-मुंंबई या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गावर सर्वात माेठे भुयारी मार्ग नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत साकारले जात अाहेत. इगतपुरी ते ठाण्यातील वशाळा गावापर्यंतचे तब्बल ७.८ किमीचे हे दाेन महाबाेगदे येथे कोरण्यात येत आहेत. यासाठी एएनटीएम तंत्रज्ञान व ड्रिलिंग ब्लास्टिंगचा उपयाेग केला जात अाहे. यामुळे नाशिक ते ठाण्यातील अंतर घटणार असून नाशिक-मुंबई हे सध्याचे ३ तासांचे अंतरही दीडच तासात कापता येईल. 


सप्टेंबर 2022 पर्यंत मार्ग खुला होणार


02 भुयारे, 08 टप्प्यांत काम, 03 पदरी रस्ते


300 मीटरवर एक इमर्जन्सी एक्झिट
 
50 वर अभियंते व कर्मचारी एका शिफ्टमध्ये


याशिवाय हवेसाठी खास व्हेंटिलेशन यंत्रणा, सीसीटीव्ही अग्निप्रतिराेधक यंत्रणा, पाणी बाहेर काढण्यासाठी ड्रेनेज.


82 फुटांपासून जमिनीखाली मार्गाची सुरुवात होणार आहे
 
1312 फुटांपर्यंत भुयारी मार्गाची खोली जाईल काही ठिकाणी46,000 कोटी प्रकल्पासाठी खर्च

१० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जाणारा हा प्रकल्प ७०० किमीचा आहे. यामुळे मुंबई-नागपूर हा १४ तासांचा प्रवास ८ तासांवर येईल. औरंगाबादवरून मुंबई वा नागपूरला फक्त ४ तासांत पोहोचता येईल.

यामुळे चर्चेत : ठाकरे सरकारने आधीच्या योजनांचा फेरआढावा घेण्याची घोषणा केली होती. मात्र आता महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे.


400 किमी विदर्भात लांबी  
 
160 किमी मराठवाड्यात
 
140 किमी उर्वरित राज्यातबातम्या आणखी आहेत...