युद्धसराव / अहमदनगरमध्ये ‘ऑपरेशन कवच प्रहार’, के. के. रेंजवर लष्कराचा युद्धसराव, भारतीय रणगाड्यांनी घेतला शत्रूसैन्याचा अचूक वेध

अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या रणगाड्यानी अचूक मारा करून आपली क्षमता या वेळी सिद्ध केली

दिव्य मराठी

Jan 14,2020 07:56:00 AM IST

अहमदनगर - सरहद्दीवर शत्रूसैन्य चाल करून येताच चेतक व ध्रुव हेलिकॉप्टर्सनी आकाशात भरारी घेतली. सैनिकांचा गोळीबार अन् तोफाद्वारे भेदक मारा करून भारतीय सैन्याने शत्रूच्या चौक्यावर तिरंगा फडकावला. युद्धभूमीवरील हे चित्तथरारक क्षण सोमवारी जिवंत झाले नगरच्या के. के. रेंजवर. निमित्त होते भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन कवच प्रहार’ या युद्धसरावाचे.

‘भारतमाता की जय’ :

अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या रणगाड्यानी अचूक मारा करून आपली क्षमता या वेळी सिद्ध केली. या वेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला.

X