आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या तारका सांगताहेत त्यांच्या फॅशनचे गुपित : ग्लॅमरस दिसणे आमचा हक्क, हवं ते बिनधास्त परिधान करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः महिलांकडून सर्वाधिक सर्च केला जाणारा विषय फॅशन. यातही त्या बॉलिवूड अभिनेत्रींची फॅशन फॉलो करतात. त्यामुळेआम्ही त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींचे फॅशन फंडे देत आहोत. या अभिनेत्रींच्याच शब्दांत जाणून घ्या ओरिजिनल कंटेंट...  

बॉलिवू़ड अभिनेत्रींचे फॅशन फंडे 

  • उर्वशी रौतेला

माझ्यासाठी फॅशन म्हणजे स्वत:ला आणि स्वत:ची मनःस्थिती व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. मला माझ्या फॅशनमध्ये प्रयोग करायला आवडतात. मला नवीन लूकचे ड्रेस घालायला आवडतात. तसेच आपल्या ड्रेसेसमध्ये नवीन आयडियाज दाखवायलाही आवडते. मी फॅशन जगते आणि फॅशनमध्ये श्वास घेते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. माझा दैनंदिन फॅशन फंडा आरामावर आधारित आहे.

  • बिपाशा बसू

मी फार कमी वयात काम करायला सुरुवात केली.  16 वर्षांची असताना या फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले होते. मी फॅशनबाबत खोलवर अभ्यास केला तेव्हा माझा सर्वात मोठा फॅशन फंडा कंफर्ट होता, हे कळले. कोणताही ट्रेंड, कितीही फॅशनेबल कपडे असो; ज्यात मला आरामदायक वाटते, तेच कपडे मी घालते. माझे दैनंदिन आउटफिट मॅक्सी किंवा गंजीज आहेत. मी व्यायाम करताना टाइट्स घालते. एका विशिष्ट काळासाठी स्टाइल करण्यात आलेली फॅशन माझ्यासाठी महत्त्वाची नाही, तर ज्यामध्ये तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल, तीच फॅशन महत्त्वाची वाटते.

  • इलियाना डिक्रूझ

आमची फॅशन फाॅलो करणाऱ्या सर्व महिला चाहत्यांसाठी माझा एक सल्ला आहे. फॅशनमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलते. ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलते, तीच फॅशन करण्याचा फंडा वापरा. माझ्या आवडीबाबत बोलायचे झाल्यास सूट असो वा स्कर्ट‌्स, मला अनारकली पॅटर्नचे ड्रेसेस जास्त आवडतात. मी लहानपणापासूनच फॅशनबाबत अनेक प्रयोग करत आले आहे.

  • सान्या मल्होत्रा

मला असे वाटते की, महिलेचा लूक आणि फॅशनेबल दिसण्यामध्ये केशभूषेची महत्त्वाची भूमिका असते. चांगल्या फॅशनमुळे महिलेच्या वागण्यामध्ये खूप बदल होतात. मला तर पायजाम्यामध्येही चांगले वाटते. मात्र, कपड्यांच्या फॅशनवर विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे.  

  • अलाया एफ

माझा फॅशन फंडा प्रयोगांवर आधारित आहे. मी माझ्या फॅशनसोबत खूप प्रयोग करत असते. मला पांढरा शर्ट आणि डेनिमचे शॉर्ट‌्स खूप आवडतात. यासोबत मला फ्लॅट स्निकर्स घालायला आवडतात. आपल्या फॅशन फंड्याबाबत बोलायचे झाल्यास मी कधी आपल्या पोशाखाबाबत गांभीर्याने विचार करते, तर कधी करतही नाही. मी आजपर्यंत कुणाकडूनही फॅशन टिप्स घेतलेल्या नाहीत, परंतु स्वत:च्या कल्पनांवर नक्कीच काम करते. माझी आई सुरुवातीपासूनच खूप स्टायलिश आहे आणि ती आधुनिक ड्रेसेसही परिधान करते. त्यामुळे मला कुठे जायचे असले आणि काही काय घालायचे हे सुचत नसले की, मी आईचे कपडे घालून घराबाहेर पडायचे.

  • तारा सुतारिया

मी माझ्या चित्रपटांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पात्रे साकारली आहेत. तसेच प्रत्येक प्रकारचे आधुनिक ड्रेसेसही मी घातले आहेत. असे असतानाही साडी हाच माझा सर्वात आ‌वडता ड्रेस आहे. मला साडीसोबतच लहंगा घालायलाही खूप आ‌वडतो. साडीमध्ये आरामदायक वाटत नाही, असे साधारणत: सर्वांनाच वाटते.

  • कियारा आडवाणी

मला लहानपणापासूनच फॅशनेबल दिसायला आणि सज्ज व्हायला आवडत होते. आता मी चित्रपट अवश्य करत आहे, परंतु माझा फॅशन फंडा पूर्वीपेक्षा पूर्णपणे उलटा झाला आहे. लहानपणी नटून-थटून आणि चांगले कपडे घालूनच घराबाहेर जात होते. आता मी घरी पोहोचताच तत्काळ आपले ट्रॅक पँट्स घालते, चप्पल घालते आणि आराम करते. कोणत्या प्रकारच्या फॅशन व ड्रेसेसमध्ये मी चांगले दिसते, हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...