ओप्पो / कंपनीचा सर्वात पावरफुल कॅमेरा फोन A9 2020 भारतात लॉन्च, रिव्हर्स चार्जिंग याचे विशेष फीचर

सेल्फी प्रेमींसाठी यामध्ये 16 मेगापिक्सेल (f/2.0) लेंस देण्यात आली आहे
 

दिव्य मराठी वेब टीम

Nov 30,2019 03:08:00 PM IST

गॅजेट डेस्क - ओप्पोने A9 2020 चा नवी वनीला मिंट एडिशन भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केल आहे. मात्र कंपनीने या फोनची किंमत आणि उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती शेअर केली नाही. कंपनीने सप्टेंबर महिन्यात हा फोन लॉन्च केला होता. तेव्हा मरीन ग्रीन आणि स्पेस पर्पल या दोन रंगांमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला होता. या फोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअपसोबत 5000mAh ची बॅटरी आणि ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर देण्यात आले आहे. वनीला मिंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हॅरियंटमध्ये मिळेल.

कंपनीचे ट्विट

ओप्पो A9 2020 चे स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 6.5-इंचचा IPS LCD टचस्क्रीन दिली आहे.

प्रोसेसर आणि रॅम


फोनमध्ये क्वालकॉम SDM665 स्नॅपड्रॅगन 665 (11nm) ऑक्टा-कोर (4x2.0 GHz Kryo 260 गोल्ड आणि 4x1.8 GHz Kryo 260 सिल्व्हर) प्रोसेसर देण्यात आले आहे. याचे GPU अॅड्रेनो 610 आहे. गेमिंगसाठी यामध्ये बूस्ट ऑप्शन देण्यात आले आहे.


मेमरी


4GB/8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज (256GB पर्यंत मायक्रो SD कार्ड सपोर्ट)

कॅमेरा


ओप्पोने या फोनमध्ये पावरफुल आणि अनेक फोटोग्राफी फीचर्ससोबत पावरफुल क्वाड कॅमेरा सेटअप केला आहे. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल (f/1.8 वाइड लेंस, 8 मेगापिक्सल (f/2.4) अल्ट्रावाइड लेंस, 2 मेगापिक्सल (f/2.4)आणि 2 मेगापिक्सल (f/2.4) डेप्थ सेंसरसोबत देण्यात आले आहे. यात डुअल टोन LED फ्लॅश, पॅनोरामा, HDR सारखे फीचर्ससोबत येतो. याद्वारे 4K रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.

तर सेल्फी प्रेमींसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल (f/2.0) लेंस देण्यात आली आहे. हे HDR फीचर्ससोबत येते. तसेच फुल HD व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते.

ऑपरेटिंग सिस्टम आणि बॅटरी

ओएस : यामध्ये अँड्रॉईड 9.0 पाय बेस्ड कंपनीचा कलरओएस 6.1 दिेले आहे. यामुळे फोनमध्ये अनेक एडिशन फीचर्स मिळतात. यामध्ये फुल स्क्रीन मल्टीटास्किंग, स्मार्ट बार. स्मार्ट रायडिंग मोड, स्मार्ट असिस्टंट, स्वाइप अप जेस्टर नेव्हिगेशन यांसारखे फीचर्स मिळतात.


बॅटरी : यामध्ये 5000mAh ची ली-पॉलीमर बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी रिव्हर्स चार्जिंग फीचर्ससोबत येते. म्हणजेच तुम्ही OTG केबलच्या मदतीने या फोनद्वारे दुसरा फोन चार्ज करू शकता. इतक्या पावरफुल बॅटरीनुसार चार्जरचा वॅट बराच कमी आहे.


कनेक्टिव्हिटी आणि सिक्योरिटी फीचर्स


कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये Wi-Fi 802.11, Wi-Fi डायरेक्ट, हॉटस्पॉट, ब्लूटूथ 5.0, GPS, FM रेडिओ, यूएसबी ऑन-द-गो, Type-C पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन दिले आहेत. म्यूझिकसाठी यामध्ये 3.5mm जॅक देण्यात आला आहे.


सिक्योरिटी : फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्नॅकर दिले आहे. हे उत्तम प्रकारे काम करते. तसेच फेस अनलॉक फीचर देखील यात देण्यात आले आहे.

किंमत


ओप्पो A9 2020 चा कॅमेरा आणि बॅटरी या फोनला विशेष बनवते. फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 16,990 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128 स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 19,990 रुपये आहे.

X
COMMENT