आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओप्पोने लॉन्च केले 2 नवीन स्मार्टफोन, पहिल्यांदाच नवीन तंत्रज्ञानाच्या ''साइड स्विंग कॅमेऱ्याचा'' समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- चीनी कंपनी ओप्पोने भारतात आपल्या ऑल न्यू रेनो सीरीजचे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. देशात पहिल्यांदाच ओप्पो रेनो आणि रेनो 10X झूम अॅडिशन लॉन्च करण्यात आले आहे. तसेच ओप्पोने आपले हे फोन चीनमध्ये यापूर्वीच लॉन्च केले आहेत. या सीरिजची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये साइड-स्विंग सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. तर याची विक्री 7 जून रोजी सुरू होईल.


साइड-स्विंग कॅमेरा म्हणजे काय?
रेनो सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये साइड-स्विंग कॅमेऱ्याचा समावेश केला आहे. याला पॉप-अप कॅमऱ्याचे अडव्हांस व्हर्जनसुद्धा म्हटले जाते. हा सिनेमा स्लेटमध्ये देण्यात आलेल्या पट्टीसारखा उघडतो. त्यासोबतच कंपनीने या पट्टीमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासोबत फ्रंट सॉफ्ट लाइट आणि रिअर LED फ्लॅशही लावला आहे. कॅमेरा आयकॉनला टच करताच अवघ्या 0.8 सेकंदात हे ओपन होते.


ओप्पो रेनो स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन
यामध्ये 6.4-इंच फुल HD+ पॅनोरामिक अॅमोलेड डिस्प्ले स्क्रीन दिली आहे. या स्क्रिनमुळे 93.1 टक्के फोनचा भाग कव्हर होतो. फोनला सुरक्षा देण्यासाठी 6th जनरेशन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन दिले आहे. तसेच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे, जे 8GB रॅम व्हॅरिअँटमध्ये येईल. हा फोम अँड्रॉइड पाय ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो जो कंपनीच्या कलर ओएसवर आधारित आहे.


फोनची इंटरनल मेमरी 128GB आहे आणि यामध्ये 48 मेगापिक्सल सोनी IMX586 प्रायमरी सेंसर आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर समावेश करण्यात आला आहे, ज्याचे अपर्चर f/2.4 आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे, याचा अपर्चर f/2.0 एवढा आहे. कनेक्टिविटीसाठी यात 4G LTE, वाय-फाय, ब्ल्युटूथ, NFC आणि USB टाइप-C पोर्ट दिले आहे. तसेच 3,765mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी VOOC 3.0 फास्ट टेक्नोलॉजीला सपोर्ट सपोर्ट करते.


किंमत : 8GB RAM + 256GB : 32,990 रुपये

ओप्पो रेनो 10x झूम एडिशनचे स्पेसिफिकेशन
यामध्ये 6.6-इंच फुल HD+ पॅनोरामिक अॅमोलेड डिस्प्ले स्क्रीन दिली आहे. 6th जनरेशन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास याच्या सुरक्षेसाठी देण्यात आला आहे. तसेच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, जे 6GB/8GB रॅम व्हॅरिअँटमध्ये दिले आहे. ये फोन अँड्रॉइड पाय ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, ही सिस्टम कंपनीच्या कलर ओएसवर आधारित आहे.

 

फोनची इंटरनल मेमरी 128GB आणि 256GB आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल सोनी IMX586 सेंसर f/1.7 लेंस, 13 मेगापिक्सल सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे, ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. कनेक्टिविटीसाठी यात 4G LTE, वाय-फाय, ब्ल्युटूथ, NFC आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आले आहे. फोनची बॅटरी 4065mAh असून, VOOC 3.0 फास्ट टेक्नोलॉजी मोडला सपोर्ट करते.

6GB RAM + 128GB : 39,990 रुपये 8GB RAM + 256GB : 49,990 रुपये

बातम्या आणखी आहेत...