Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | opponent aggressive on tax increase; warning of protest

भाजपवर 'अविश्वास'; विराेधक करवाढीवरून अाक्रमक; अांदाेलनाचा दिला इशारा

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 10:42 AM IST

अायुक्त तुकाराम मुंढे यांच्याविराेधात अविश्वास प्रस्ताव रद्द झाल्यानंतर भाजपवरच अविश्वास व्यक्त करताना विराेधी पक्ष असले

 • opponent aggressive on tax increase; warning of protest

  नाशिक- अायुक्त तुकाराम मुंढे यांच्याविराेधात अविश्वास प्रस्ताव रद्द झाल्यानंतर भाजपवरच अविश्वास व्यक्त करताना विराेधी पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, मनसेने अाक्रमक पवित्रा घेत करवाढीवरून अांदाेलन उभारण्याचा इशारा दिला.


  उद्धव ठाकरेंकडे जाणार शिवसेना
  महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अाणि विराेधी पक्षनेते असलेल्या शिवसेनेने थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेण्याची तयारी केली अाहे. विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते म्हणाले की, यानिमित्ताने भाजपची पाेलखाेल झाली असून नाटक कंपनीगत त्यांची अवस्था अाहे. करयोग्य मूल्य दरातील वाढीमागे भाजपच असल्याचा अाराेप करीत आयुक्त मुंढे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कृती केल्याचा अाराेप केला. आता मुंढे यांच्यावर नव्हे तर जनतेच्या दरबारात भाजपवरच अविश्वास येणार अाहे.


  म्हणून शिवसेनेचे 'वेट अॅण्ड वाॅच'
  करवाढीमागे मुंढे नव्हे तर भाजप असल्याचा संशय हाेता. खुद्द आयुक्त मुंढे यांनी ५० टक्के करवाढ मागे घेताना मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितल्याने त्यास पुष्टी मिळते. त्यामुळेच शिवसेेनेने 'वेट अॅण्ड वाॅच'ची भूमिका घेतली. सरसकट करवाढ रद्दच्या भूमिकेवर अाम्ही ठाम असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साकडे घालू.
  - अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेता


  भाजप-मुंढे एकच; दत्तक नाशिकची लूट
  सरसकट करवाढ रद्द झालीच पाहिजे अशा प्रमुख मागणीवर ठाम अाहे. यानिमित्ताने भाजप व आयुक्त मुंढे एकच असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ५० टक्के करवाढ मागे घेण्यात आली असली तरी ५० टक्के करवाढ भाजपला मान्य असल्यामुळे त्यास पुष्टी मिळते. करवाढीच्या रूपाने दत्तक नाशिकची लूट हाेत असल्याची बाब दुर्दैवी अाहे.
  - रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.


  करवाढीचा नाशिक पॅटर्न
  मनसेने करवाढ न करता नाशिकचे नवनिर्माण केले. मात्र, भाजपने करवाढीतून नाशिककरांचा बळी दिल्याची भावना अाहे. मुख्यमंत्र्यांच्याच सूचनेवरून करवाढ झाली असून अाता राज्यभरात हाच करवाढीचा 'नाशिक पॅटर्न' राबवण्याची तयारी अाहे. सरसकट करवाढ रद्द करण्याची मनसेची भूमिका असून येत्या काळात रस्त्यावर उतरू.
  - सलीम शेख, गटनेता, मनसे


  काँग्रेस करवाढ रद्दवर ठाम; भाजप दांभिक
  जुन्या मिळकतीच्या कर याेग्य मूल्यावर १८ टक्के वाढीलाही काॅंग्रेसचा विराेेध हाेता. आता नवीन मिळकतीसह अन्य बाबतीत ५० टक्के करकपात करून उर्वरित ५० टक्के करवाढ कायम ठेवली अाहे. नाशिककरांवरील करवाढ सरसकट रद्द व्हावी अशी मागणी अाहे. यानिमित्ताने भाजप दांभिक असल्याचे स्पष्ट हाेते.
  - शाहू खैरे, गटनेता, काँग्रेस

Trending