आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Opponents Have Asked 'Article 370' A Thousand Times, So It Was Deleted BJP National Spokesperson Shahnawaz Hussain

विराेधकांनी हजार वेळा ‘कलम ३७०’विषयी विचारले, म्हणून तर ते हटवले - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत काश्मिरातील ३७० आणि ३५ (ए) हे कलम रद्द करण्याविषयी विराेधकांनी आमच्याकडे हजार वेळा विचारणा केली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी तर ‘मोदी दहा वेळा पंतप्रधान झाले तरी ३७० रद्द करू शकत नाहीत,’ अशा शब्दांत आम्हाला हिणवले. त्यांच्या मागणीनुसारच आम्ही ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला,’ असा टाेला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी लगावला. दैनिक दिव्य मराठीच्या औरंगाबाद कार्यालयातील संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

> प्रश्न : काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले जाईल, या निर्णयाची प्रवक्त्यांना तरी माहिती हाेती का? 
शाहनवाज : सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच ‘कलम ३७०’ही तातडीने हटवले जाईल याची कल्पनाही नव्हती. सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतरच सर्व देशवासीयांप्रमाणे आम्हालाही माध्यमांतूनच समजले. मोदी एवढा मोठा निर्णय घेतील कल्पनाच नव्हती. 
 

> प्रश्न : राममंदिराबाबतही निर्णय अपेक्षित आहे? 
शाहनवाज : या विषयावर काहीही बाेलण्यास मोदी यांनीच अंकुश लावलेला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून कोर्टाच्या निर्णयावर कुणालाच आक्षेप राहणार नाही. निर्णयाचे सर्वजण स्वागतच करतील. 

> प्रश्न : काश्मीरमध्ये आता मानवी हक्कांची गळचेपी होते, त्याचे काय? 
शाहनवाज : फारूख अब्दुल्ला यांचे वडील शेख अब्दुल्ला यांना काँग्रेसने ११ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवले होते. आम्ही तसे कुणालाही अडकवलेले नाही. तेथील जनजीवन सुरळीत सुरू आहे. महत्त्वाच्या नेत्यांची नजरकैदेतून सुटका केली आहे.  पाकिस्तानकडून प्रपाेगंडा हाेऊ नये, साेशल मीडियावर चुकीचे संदेश जाऊ नयेत म्हणून इंटरनेट सुविधा बंद हाेती. 

> प्रश्न: कलम ३७० हटवल्यानंतर मुस्लिम समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत?
शाहनवाज : कलम ३७० हटवले म्हणून देशात कुठेच मुस्लिम समाजाने मोर्चा काढला नाही. युरोप-कॅनडासारखी रॅडिकल इस्लाम थेअरी भारतात नाही. इंडोनेशियानंतर भारतात सर्वाधिक मुस्लिमांची संख्या आहे. भारतामधील मुस्लिम समाज कट्टरतावादाला कधीच प्रोत्साहन देत नाही.

> प्रश्न : भाजपच्या ३०३ खासदारांमध्ये एकही मुस्लिम नाही. मोदींवर अल्पसंख्याकांचा विश्वास कसा राहील?
शाहनवाज : आपण स्वत: तीन वेळा भाजपचे खासदार हाेताे, मंत्रीही हाेताे. मुख्तार अब्बास नक्वी केंद्रात मंत्रीही आहेत. आरिफ बेग अनेक वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे भाजपवर अल्पसंख्याकांचा विश्वास नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, विराेधक असा चुकीचा प्रचार करत आहेत. हरियाणात आता तय्यब हुसेन चौधरींच्या मुलास उमेदवारी दिली आहे. दोन ठिकाणी मुस्लिम उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढत आहेत.

> प्रश्न : एनआरसीमुळे दहशतीचे वातावरण आहे? 
शाहनवाज : ‘एनआरसी’बाबत भारतामधील मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही. त्याची भीती बांगलादेशातून घुसखाेरी करणाऱ्यांना आहे. त्यांनी आपल्या देशात जावे. भारताने येथे धर्मशाळा उघडलेली नाही. 

> प्रश्न: मोदी, शहा आणि भागवतांच्या हिंदुराष्ट्रात शाहनवाज हुसेन कुठे आहेत?
शाहनवाज : मोहन भागवत यांनी मुस्लिमांशिवाय हिंदुराष्ट्र शक्य नसल्याचे म्हटले आहे. हिंदू याचा संबंध केवळ धर्माशी जोडणे योग्य नाही. हिंदूपासून हिंदी आहे. हिंदू एक संस्कृती असून जगण्याची पद्धत आहे. हिंदुत्वात मोठी व्यापकता आहे. इस्लाममध्ये एक खुदा आहे. हिंदूंमध्ये सनातनी, आर्य समाजी, निरंकारी, अकाली आहेत. सर्वांना सामावण्याची क्षमता हिंदू धर्मात आहे. 

> प्रश्न : देशात ईडीचा धाक दाखवला जात आहे... 
शाहनावाज : ज्यांनी काही घाेटाळे केलेत त्यांना आता भोगावे लागेल. ईडीची कारवाई भाजपच्या सांगण्यानुसार होत नाही. चाैकशीत काही आढळले तर त्याला शासन होईल, परंतु काहीच आढळले नाही तर घाबरण्याचे कारण नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...