आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opportunity For 13 People In The Series; 12 Players Played Minimum Than The Average

मालिकेत 13 जणांना संधी; 12 खेळाडूंची सरासरीपेक्षा सुमार खेळी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

​​​​ख्राइस्टचर्च : यजमान न्यूझीलंडविरुद्ध कसाेटी मालिकेत पाहुण्या टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे भारताने ही कसाेटी मालिका गमावली. यातूनच तब्बल अाठ वर्षांनंतर टीम इंडिया मालिकेतील सर्वच सामन्यांत अपयशी ठरला. या मालिकेसाठी भारताने १३ खेळाडूंना संधी दिली. यातील १२ खेळाडू सपशेल अपयशी ठरले. त्यांनी अापल्या सरासरीपेक्षा कमी दर्जाची खेळी केली. यामध्ये काेहलीचाही समावेश अाहे.

टाॅप-३ गाेलंदाजांमध्येही स्थान नाही : 

न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या गाेलंदाजांसाठी पाेषक मानल्या जातात. तरीही टीमचे वेगवान गाेलंदाज या पिचवर सपशेल अपयशी ठरले.  टाॅप-३ गाेलंदाजांमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता अाले नाही. साउथीने १४ बळी घेतले. भारताकडून बुमराहने ६ बळीसह चाैथे स्थान गाठले.

मालिकेत चाैघांचा १००+ स्काेअर 

कसाेटी मालिकेत गाेलंदाजांचा दबदबा कायम राहिला. त्यामुळेच फक्त चाैघा फलंदाजांनाच १००+ धावांची कमाई करता अाली. यात  सलामीवीर टाॅम लाॅथमने ११७ धावांसह अव्वल स्थान गाठले. यात भारताच्या मयंक अग्रवाल (१०२) दुसऱ्या व पुजाराने (१००) तिसरे स्थान गाठले. 

अंतर : दाेन्ही वेळा नाणेफेकीत अपयश; अाघाडीनंतरही पराभव 

न्यूझीलंडमध्ये गत चार वर्षांत २१ पैकी १३ सामन्यांत प्रथम गाेलंदाजी करणारा संघ विजयी ठरला. अाता दाेन्ही कसाेटी सामन्यांत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने गाेलंदाजीचा निर्णय घेतला.  भारताने अाघाडीनंतरही कसाेटीत पराभवाचा सामना केला. भारताला दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ७ धावांची अाघाडी मिळाली हाेती. 

दाेन दशकांतील सर्वात निराशादायक दाैरा 

विमलकुमार 

न्यूझीलंड दाैऱ्याला दमदार सुरुवात करताना भारताने टी-२० मालिका विजयाचा माेठा पराक्रम गाजवला. हे पहिल्याच प्रयत्नातील यश काैतुकास्पद ठरले. मात्र, त्यानंतरच्या वनडे अाणि कसाेटी मालिकेतील अपयशाने भारतीय संघाला अाता टीकेला ताेंड द्यावे लागत अाहे. या दाेन्ही मालिकांतील भारतीय संघाची कामगिरी अत्यंत सुमार ठरली. याच लाजिरवाण्या पराभवामुळे बलाढ्य मानला जाणारा भारतीय संघ दाैऱ्यात सपशेल दुबळा ठरला. या वनडे मालिकेतील पराभवाचे अपयश लपवताना काेहलीने वेगळ्याच पद्धतीने प्रतिक्रिया दिली हाेती. त्याच्या मते टी-२० वर्ल्डकप अाणि कसाेटी चॅम्पियनशिपच्या यंदाच्या वर्षात मर्यादित षटकांतील पराभव हा कानाडाेळा करण्यासारखा अाहे. मात्र, याच प्रतिक्रियेनंतर भारताला कसाेटी मालिकेत सपाटून मार खावा लागला. यात दाणादाण उडाल्याने भारताने ही दाेन कसाेटी सामन्यांची मालिका ०-२ ने गमावली. याच मालिकेच्या दाेन्ही कसाेटी सामन्यांत भारताच्या फलंदाजांना माेठी खेळी करता अाली नाही. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाघाडीवर अाहे. ताे या मालिकेत टीकेचा धनी ठरला. त्याला मालिकेतील चारही डावांत माेठी खेळी करता अाली नाही. यातूनच हा कसाेटी मालिकेसाठीचा भारतीय संघाचा यंदाचा दाैरा सर्वात निराशाजनक ठरला. यातून भारतीय संघाची कसाेटीच्या फाॅरमॅटमधील सुमार खेळी दिसून अाली. गाेलंदाजांसाठी पाेषक असलेल्या न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर भारताचे गाेलंदाजांही माेठी खेळी करू शकले नाहीत. मात्र, त्याच मानाने न्यूझीलंडच्या गाेलंदाजांनी याच मैदानावर अापले वर्चस्व अबाधित ठेवले. यात टीम सााउथी अाणि काएले जेमिसन अाघाडीवर अाहेत. जेमिसनने जबरदस्त पंच मारताना टीम इंडियाची दाणादाण उडवली.  नाणेफेक अाणि खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची मानली गेली. या दाेन्ही भूमिकांत भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला. 

बातम्या आणखी आहेत...