आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी पर्यटकांना होतोय विरोध, अनेक देश पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या वर्षी ईस्टर संडेच्या दिवशी १,२५,००० पेक्षा जास्त पर्यटक व्हेनिसला आले होते. व्हेनिसमध्ये स्थानिक लोकांची संख्याच ५४ हजार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक आल्यामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. हे तर एक उदाहरण आहे. जगातील अनेक देश पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त आहेत. युरोपच्या अनेक देशांत विदेशी पर्यटकांना विरोध होत आहे. त्यामुळेच वाढत्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे गेल्या वर्षी आॅक्सफर्ड डिक्शनरीत ओव्हर टुरिझम हा शब्द समाविष्ट करण्यात आला. 

 

युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम आॅर्गनायझेशनने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, २०१८ मध्ये १.४ अब्ज आंतरराष्ट्रीय प्रवास झाले. या संख्येचा अंदाज संस्थेने आपल्या २०१० च्या अहवालात दोन वर्षांनंतरच्या वर्षासाठी बांधला होता. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन आॅफ इंडियाचे (टीएआय) माजी अध्यक्ष आणि पर्यटन सल्लागार रज्जी राय यांनी सांगितले की, इटली, फ्रान्ससह अनेक युरोपीय देशांत पर्यटक जास्त झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणची पर्यावरण यंत्रणा बिघडते. त्यामुळे स्थानिक लोक प्रभावित होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न असतो. 

 

रज्जी राय सांगतात की, व्हेनिसमध्ये लहान नौका चालतात, पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर तेथे त्या चालवणेही कठीण झाले आहे. पर्यटक कचराही पसरवतात. आम्हाला वेळोवेळी याबाबत इशारा आणि सल्ला मिळतो. आम्हीही आपल्या एजंट्सना सांगतो की, पर्यटकांना अशा स्थळी जाण्यापासून रोखा. भारताबाबत बोलायचे तर सिमला, नैनितालमध्ये पिक सीझनमध्ये तास-दीड तास शहरात प्रवेश करण्यासाठीच लागतो. मसुरी-नैनितालमध्ये पर्यटकांची संख्या जास्त झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला झोपलेलेही दिसतात.

 

रोड व्हेंचरर संजीव शर्मा म्हणाले की, लडाखमध्ये पेंगॉग लेकजवळ पर्यटक छावण्या उभारल्या जात असत. या छावण्यांमुळे मे ते सप्टेंबरपर्यंत लहान-मोठे गावच उभे राहिल्याचे दृश्य दिसत असे. पण त्यामुळे होणाऱ्या घाणीमुळे तलावाचे पाणी प्रदूषित व्हायला लागले. आता प्रशासनाने फक्त पर्यटकांना जाण्याची आणि पाहण्याचीच परवानगी दिली आहे. आता कोणी छावणी उभी करू शकणार नाही.

 

एखाद्या विशेष पर्यटनस्थळी गर्दी झाल्यानेही ओव्हर टुरिझमची समस्या उद्भवत आहे. उदा. इटलीबाबत बोलायचे तर २०१० ते २०१५ च्या दरम्यान ६० टक्क्यांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक फक्त व्हेनेटो, लॅजियो, टस्कनी, लॉमबार्डी या चार ठिकाणी आले होते. व्हेनिस व्हेनेटोमध्ये येते.वेगाने वाढले आहे पर्यटन क्षेत्र : २०१८ मध्ये जगभरात इतर सर्व आर्थिक क्षेत्रांच्या तुलनेत सर्वात जास्त वाढ प्रवास आणि पर्यटन क्षेत्राची झाली आहे. 

 


जागतिक जीडीपाला या क्षेत्रातून ८.८ ट्रिलियन डॉलर मिळाले, ही रक्कम २०१७ मध्ये ८.३ ट्रिलियन डॉलर होती.सर्वाधिक वाढ असलेल्या उत्पादन क्षेत्राचा जागतिक जीडीपीतील वाटा ४ टक्के होता, तर प्रवास आणि पर्यटन क्षेत्राचा वाटा ३.९ टक्के राहिला.


सर्वात जास्त पर्यटक युरोपमध्ये : प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील सर्वाधिक उलाढाल युरोपियन बाजारात दिसली. २०१८ मध्ये तिथे तब्बल २.२ ट्रिलियन डॉलरची उलाढाल झाली आहे.


किती लोक विदेशात फिरण्यास जातात
२०१८ मध्ये विक्रमी १.४ अब्ज आंतरराष्ट्रीय पर्यटक दुसऱ्या देशात सुट्या घालवण्यासाठी गेले. हा आकडा २०१७ पेक्षा ६ टक्के जास्त आहे.


असे वाढले पर्यटक
वर्ष     पर्यटकांची संख्या
१९५०     २.५ कोटी
१९७०     १६.६ कोटी
१९९०     ४३.५ कोटी
२०१८     १.४ अब्ज


सर्वाधिक कुठून गेले
१४.३ कोटी विदेश दौरा चीनच्या लोकांनी २०१७ मध्ये केला. हा जगात सर्वाधिक.


सर्वात जास्त कुठे गेले
७१.३ कोटी पर्यटक युरोपला गेले २०१८ मध्ये. त्यापैकी ९ कोटी लोक फ्रान्सला गेले.

 

इटली
व्हेनिसमध्ये वार्षिक ३ कोटी पर्यटक येत आहेत. दिवसभरासाठी येणाऱ्या पर्यटकांवर ३ युरो शुल्क लावले आहे. येथेही स्थानिक लोकांना भाडे वाढल्याने घर सोडावे लागत आहे.


आइसलँड
२००८ मध्ये आर्थिक संकटानंतर आइसलँड पर्यटनामुळे वेगाने पुढे आला होता, पण आता तो ओव्हर टुरिझममुळे त्रस्त आहे. रेकवाझिक शहरात वाहतूक, आरोग्य सेवांवर पर्यटकांमुळे भार वाढला आहे.


स्पेन
बार्सिलोनात इन्स्पेक्टर एअरबीएनबी आणि इतर रन होम रेंटल सेवांच्या डाटाची तपासणी करत आहेत. अवैध हॉटेल बंद केली जात आहेत. शहरात राहणाऱ्या पर्यटकांवर कर लावला जात आहे.


थायलंड
२००० मध्ये आलेल्या लिओनार्डो डी कॅप्रिओच्या ‘द बीच’ चित्रपटात दाखवल्याने येथील माया बे बीच खूप प्रसिद्ध झाला. या वर्षी तो तात्पुरता बंद झाला. आता येथील पर्यटक कमी केले जातील.


पेरू
पेरूत इंका सभ्यतेचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथे काही निश्चित वेळेच्या हिशेबाने तिकिटे दिली जात आहेत. तसेच मुख्य साइटवर जाण्यासाठी परवानाधारक गाइड आवश्यक आहे.


आणि भारतात या शहरांत वाढत आहेत पर्यटक
नैनिताल

उन्हाळ्यात रोज अतिरिक्त ३-४ हजार कारमुळे अनेक तास ट्रॅफिक जाम. आता सरकारने पर्यटकांनी कचरा केल्यास हॉटेलकडून शुल्क घेण्याची तयारी केली आहे.


सिमला
येथे प्रतिबंधित रस्ते खुले करूनही ट्रॅफिक जाम होते. उन्हाळ्यात पाणी समस्या असते. उन्हाळ्यात टप्प्यानुसार एक दिवसाआड पाणी दिले जाते.


उटी
घाण रोखण्यासाठी प्लास्टिकवर बंदी आहे. पर्यटकांच्या वाहनांकडून ग्रीन सेसच्या रूपात पैसे घेतले जातात. प्रमुख ठिकाणी स्वच्छतेसाठी बोर्ड लावले.

 

1.  ६५% पाणी पर्यटक वापरत आहेत
बाली बेटाचे ६५% पाणी पर्यटन क्षेत्रात वापरले जाते. सुमारे ४०० नद्यांपैकी २६० नद्या कोरड्या पडल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचे केपटाऊन शहरही पाणी संकटाशी झुंजत आहे. स्पेन, ग्रीस आणि इटलीत २०४० पर्यंत पाणी संकट उद्भवेल.


2. स्थानिकांपेक्षा जास्त रोज पर्यटक येत आहेत
व्हेनिसमध्ये १९४५ च्या आसपास १,७५,०० स्थानिक लोक होते, आता त्यांची संख्या घटून ५४ हजारांवर आली आहे. विशेष म्हणजे व्हेनिसमध्ये रोज सुमारे ६२ हजार पर्यटक येतात. हंगामात ही संख्या एक लाखावर जाते.


3. एका शहरात २ ठिकाणी २००० टन कचरा
मनालीत या वेळी पिक सीझनच्या दोन महिन्यांत २ हजार टन कचरा गोळा झाला. सुमारे ६ लाख लोकसंख्येच्या ल्युकझेमबर्गमध्ये वार्षिक ७ लाख मेट्रिक टन आणि १३ लाख लोकसंख्येच्या अॅस्टोनियात वार्षिक ३ कोटी मेट्रिक टन कचरा निघतो.

 

4. महाग घरे आणि अवैध हॉटेल वाढले
स्पेनच्या माद्रिद, बार्सिलोनात ३५% पर्यंत भाडे वाढले आहे. स्थानिकांनी अनेकदा निदर्शने केली आहेत. २०१६ मध्ये बार्सिलोनात प्रशासनाने बिगर लायसन्स अपार्टमेंटचा प्रचार करण्यासाठी एअर बीएनबी, होमअवेवर ६ लाख पौंडांचा दंड केला.