आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधक आणि राज्य सरकारची मिलीभगत?:मंत्री गिरीश बापटांच्या वक्तव्यावर खसखस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अधिवेशनादरम्यान बऱ्याचदा एखाद्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांची मिलीभगत असल्याच्या बाबी समोर येत असतात. मंगळवारी असाच प्रकार विधानसभेत पाहायला मिळाला. मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावरून सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेतील कामकाज रोखून धरत आरक्षणावर चर्चेची मागणी आक्रमकपणे लावून धरली. चौथ्या वेळी झालेल्या तहकुबीनंतर जेव्हा कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधकांनी पुन्हा गोंधळाला सुरुवात केली.

 

पीठासीन अध्यक्षांनी दुष्काळावर विशेष चर्चेसाठीचा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव पुकारला. त्यानुसार भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे बोलण्यास उभे राहिले. मात्र, गोंधळात त्यांना बोलणेही अवघड होत होते. त्यावर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट उभे राहून विरोधकांना उद्देशून म्हणाले की, आज बोंडेंना दुष्काळावरील सत्ताधाऱ्यांच्या चर्चेचा प्रस्ताव मांडू द्या. मग आपण कामकाज दिवसभरासाठी तहकूब करू आणि परवा गुरुवारी विरोधकांचा दुष्काळावरील चर्चेचा प्रस्ताव आल्यानंतर एकत्रित चर्चा करू. बापटांच्या या वाक्याने सभागृहात एकच खसखस पिकली.

बातम्या आणखी आहेत...