आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक व्यवस्था टिकवायची असेल तर विरोधी पक्ष गरजेचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब : आर्थिक व्यवस्था टिकवायची असेल तर विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. बहुजन वंचित आघाडीचे धनंजय शिंगाडे यांच्या प्रचारार्थ कळंब शहरातील बाजारात सभा घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर राम गारकर प्रभारी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना अनिल हजारे, पंकज काटे, प्रा नागोराव पांचाळ, डाॅ. सुभाष वाघमारे, जिल्हा अध्यक्ष भारिप उस्मानाबाद विशाल शिंगाडे, लाखन गायकवाड, अॅड त्रिंबक मनगिरे, वसीम शेख, रसूल खान पठाण, विठ्ठल समुद्रे, सुफी सय्यद, बजरंग ताटे, अस्मिता पारवे, अरुण गरड, अॅड. आबासाहेब पायाळ, अॅड. वाघमारे, विकास बनसोडे, अनुराधा लोखंडे, प्रवीण रणबागूल, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, सध्या निवडणुका म्हणजे उत्सव असून हा उत्सव साजरा करा आणि मतदान करा, असे सांगितले जात आहे. मात्र त्या नंतर हे सरकार आपले हात बांधून टाकणार आहे. मग हा उत्सव कसला असा प्रश्न उपस्थित केला. मागील अनेक वर्षांपासून १५ लाख खात्यावर येणार आहेत. असे सांगितले जात आहे. मात्र हे पैसे कधी येणार नाहीत. उलट बँका बंद पडल्या जात आहेत. त्यामुळे पुढील काळात आपला पैसा सुरक्षित असेल का नाही हा विचार करणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांत बँक बुडवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आणि त्यांना आत मध्ये टाकले जाते. आत जाणे म्हणजे पैसा पचवणे असा अर्थ होतो. सध्या बँका बुडाल्यामुळे अनेकांच्या कष्टांचे पैसे बुडले आहे. आणि या पुढील काळात आणखीन काही बँक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. पुढील काळात या बँका वाचण्यासाठी वंचित बहुजन आघडी सोबत आपण सर्वांनी राहणे गरजेचे आहे. सध्या हमीभाव म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. शासनाने कापसाला ५५०० रुपये हमी भाव दिला आहे. मात्र प्रत्यक्षात हा भाव मिळणे शक्य नाही, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या वेळी आभार सी. पी. घाडगे यांनी केले आहे.