आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दाखल केला अर्ज, शक्तीप्रदर्शनाने दणाणून सोडले परळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त निघालेल्या अतिविराट रॅलीने भारतीय जनता पार्टीची फॉर्म भरण्याच्या दिवशीच दांडीगुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मतदारसंघातून जमलेला हजारोंचा जनसमुदाय व त्यांच्यातील उत्साह ही निवडणूक धनंजय मुंडेच जिंकणार याची साक्ष देत होता.

आज(3 ऑक्टोबर) सकाळी धनंजय मुंडेंनी परळी येथे प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले, त्यानंतर जन्मगाव नाथ्रा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील समाथीस्थळी तसेव वडील स्व.पंडीतअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून त्यांनी दर्शन घेऊन तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्जाचे 4 संच दाखल केले. 
 
दुपारी 02 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेली रॅली धनंजय मुंडे यांच्या विजयाची साक्ष देणारी होती. सुमारे 4 तास चाललेल्या या रॅलीत मतदारसंघातील महिला, पुरूष आणि तरूणाई प्रचंड उत्साहाने सहभागी झाली होती. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, एकमिनार चौक, सरदार सायकल मार्ट, सुभाष चौक, पद्मावती, गणेशपार, अंबेवेस, तळपेठ मार्गाने निघालेल्या रॅलीचा समारोप मोंढा मैदानावर झाला. ठीक-ठीकाणी रॅलीचे व धनंजय मुंडे यांचे परळीकरांनी अभूतपूर्व स्वागत केले, पुष्पवृष्टी करण्यात आली, महिलांनी औक्षण करून तर व्यापार्‍यांनी पुष्पहाराने त्यांना शुभेच्छा दिल्या.
 

गर्दीच-गर्दी अन दांडी गुल

रॅलीची सुरूवात शिवाजी चौकातून होती, मात्र आझाद चौक ते शिवाजी चौक अशा गर्दीने रस्ता जाम झाला होता. कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला... एकच भाऊ धनुभाऊ अशा घोषणांनी तरूणाईंनी संपूर्ण परळी दणाणून सोडली. या रॅली व फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमास यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, माकपचे नेते कॉ.पी.एस.घाडगे, काँग्रेसचे नेते संजय दौंड, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, दत्ताआबा पाटील, जि.प.सदस्य अजय मुंडे, डॉ.संतोष मुंडे, वाल्मिकअण्णा कराड, प्रा.मधुकर आघाव, रा.काँ.तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, रणजित लोमटे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, ज्येष्ठ नेते सोमनाथअप्पा हालगे, उपनगराध्यक्ष अय्यूबभाई पठाण, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, एस.एल.देशमुख, कृ.उ.बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.गोविंद फड, पं.स.सभापती मोहनराव सोळंके, सुर्यभान मुंडे, माणिकभाऊ फड, प्रा.विनोद जगतकर, माऊली गडदे, सुंदर गित्ते, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.