आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधक: समितीचे अध्यक्ष होते आमदार; सत्ताधारी : हे तर अपशब्द, माफी मागा; विरोधी पक्षनेत्यांची दिलगिरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पारस येथील महाजल घाेटाळ्यावरुन बुधवारी जि. प.च्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारिप-बमसं, विराेधक भाजप सदस्यांत घमासान झाले. हा घाेळ झालेल्या काळात पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष हे अामदार बळीराम शिरस्कार हाेते, असा उल्लेख भाजप सदस्य, या प्रकरणातील तक्रारकर्ते रामदास लांडे यांनी अाक्रमक हाेत अनेकदा केला. परिणामी स्वपक्षाच्या अामदाराचे नाव घेतल्याने भारिप-बमसंचे सदस्यांनी विराेधकांना धारेवर धरले. हे अामदारांबाबत अपशब्द असून, माफी मागा, अशी मागणी भारिप सदस्यांनी केली. सत्ताधारी विराेधक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला. अामदाराच्या उल्लेखाची निंदा करीत भारिप-बमसंच्या सदस्यांनी माफीची मागणी लावूनच धरली. अखेर विराेधीपक्ष नेते भाजप सदस्य रमण जैन यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला. मात्र सभेनंतर जि. अावारात पुन्हा भाजप, भारिप-सदस्यांमध्ये याच मुद्द्यावर शाब्दिक चकमक झाली. दाेन्ही सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुदैवाने काही सदस्यांनी मध्यस्थी केल्याचे वाद मिटला. पारस महाजलच्या चाैकशीबाबत सदस्य रामदास लांडेंनी मुद्दा उपस्थित केला.

 

याप्रकरणी उपोषणानंतर १५ दिवसात चौकशीचे अाश्वासन सीईआेंनी दिले  हाेते. मात्र चाैकशी का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. यावर सीईअाे कैलास पगारेंनी चाैकशी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. मात्र या उत्तराने लांडेंचे समाधान झाले नाही. महिनाभर विहीर सापडण्यासाठी लागला, असे म्हणत पाणी दाखवा, असे अावाहन त्यांनी केले. यावर पाणी अाटले असेल, असे भारिप-बमसंचे सदस्य जगताप म्हणाले. खर्चानंतरही पाण्याअभावी घसा काेरडा असून, त्यावेळी समितीचे अध्यक्ष अामदार बळीराम शिरस्कार हाेते, असे लांडे म्हणाले. यावर जगताप यांनी या प्रकरणाशी अामदारांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. हे अामदारांबाबत अपशब्द असल्याचे भारिप-बमसंचे सम्राट डाेंगरदिवे म्हणाले. या प्रकरणाचे राजकारण हाेत असून, चौकशीही पूर्ण झाली नाही, असे भारिप-बमसंचे गाेपाल काेल्हे म्हणाले. भ्रष्टाचाराचे अाम्ही समर्थन करीत नसून, समितीच्या अध्यक्षांचे नाव कुठे अालेले नाही. अाम्हीही इतर अामदारांची नावं अनेक प्रकरणांत घेऊ शकताे. मात्र कोणतीही बाब सिद्ध झाली नसतानाही अाराेप करणे-नाव घेण्याची सवय नसल्याचा टाेला काेल्हेंनी लगावला. अामदारांबाबत केलेल्या व्यक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी जगताप यांनी केली. मात्र माफी मागणार नाही, असे लांडे यांनी ठणकावले.

 

लांडेंकडून नंतर भाजपचे सदस्य संताेष वाकाेडे, गजानन उंबरकार, अक्षय लहाने, विलास इंगळे धावून अाले. भाजपकडून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कामकाज सुरु झाले. सभेला अध्यक्षा संध्या वाघाेडे, उपाध्यक्ष जमीरउल्ला खान पठाण, सभापती अरबट, रेखा अंभाेरे, पाताेंड, माधुरी गावंडे, शाेभा शेळके, चंद्रशेखर पांडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास खिल्लारे उपस्थित हाेते.

 

अभियंता म्हणाले, त्याचे पुरावे नाहीत, असे ग्रामस्थांनी सांगितले 

पारस महाजल घाेळावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशाेर ढवळेंनी माहिती दिली. फाेटाे दाखवत त्यांनी येथे विहिर अाढळल्याचे सांगितले. तेथे ट्यूबवेल अाहे. मात्र या विहिरीतून पाणी पाेहाेचले नसून, दुसऱ्या टाकीतून अाेव्हरफ्लाे हाेऊन पाणी पाेहाेचत हाेते. यासाठी तात्पुरती वीज जाेडणी घेतली, असे ते म्हणाले. यावर वीज जाेडणीचे दस्तावेज दाखवा, असे लांडे म्हणाले. मात्र याचे पुरावे नसून, लाेकांनी तसे सांगितल्याचे ढवळे म्हणाले.

 

उपस्थित सदस्यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला 

सभेनंतर भाजप सदस्य रामदास लांडे याप्रकरणी बाेलतच सभागृहाबाहेर पडले. त्यांच्यासमाेर भारिप-बमसं सदस्य गाेपाल काेल्हे हाेते. यावर काेल्हेंनी अाक्षेप घेतला. १० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात जाग अाली; तेव्हाच का नाही अावाज उठवला, असा सवाल काेल्हेंनी केला. यावर लांडेही अाक्रमक झाले. तुम्हाला मध्ये बाेलण्याची काय गरज हाेती, असा सवाल त्यांनी केला. दाेघे एकमेकांच्या दिशेने धावून गेले. उपाध्यक्ष जमीर उल्लाखान, भाजप सदस्य संताेष वाकाेेडेंनी धाव घेत मध्यस्थी केली. 

बातम्या आणखी आहेत...