आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opposition Meet Today On Citizenship Law, NRC, Mamata Banerjee To Skip News And Updates

एनआरसी-सीएएवर चर्चा करण्यासाठी विरोधकांची दिल्लीत बैठक, ममता, मायावती आणि आपने फिरवली पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीएए-एनआरसीच्या नावाने डावे आणि काँग्रेस आंदोलनाच्या नावाने नासधुस करत आहेत- ममता बॅनर्जी
  • नागरिकत्व कायद्या देशातील नागरिकांना धार्मिक आधारावर विभाजित करत आहे- सोनिया गांधी

नवी दिल्ली- देशभरातील विद्यार्थ्यांचा विरोध, नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि सध्याची राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसने सर्व विरोधकांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि बसपा प्रमुख मायावती सामील होणार नाहीत. आपनेही बैठकीला न येण्याचे जाहीर केले आहे.

ममता बनर्जींनी मागच्या आठवड्यात ट्रेड यूनियनच्या स्ट्राइकदरम्यान डावे आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळामुळे विरोधकांच्या बैठकीला न जाण्याची घोषणा केली होती. त्या म्हणाल्या की, मीच विरोधकांच्या बैठकीची संकल्पना मांडली होती, पण राज्यात जे काही झाले, त्यावरुन मी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. एनआरसी-सीएएविरोधात सर्वात आधी मी आंदोलन सुरू केले होते. सीएए-एनआरसीच्या नावाने डावे आणि काँग्रेस आंदोलन न करता देशाची नासधुस करत आहेत.

अनेक मुख्यमंत्र्यांचा सीएए-एनआरसी लागू करण्यास नकार

मागच्या महिन्यात सीएएबाबत विरोध करत असलेल्या दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर देशभरातील विद्यापिठांमध्ये विरोध प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अनेक राजकीय पक्षांनीही सहभाग घेतला होता. त्यानंतर अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राज्यात सीएए लागू न करण्याची भूमिका घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...