आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनात विरोधी आमदारांची उडी, सुरक्षा रक्षकांसोबत धनंजय मुंडेंची झाली बाचाबाची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विनाअनुदानित शिक्षकांचे सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आता विरोधी पक्षातील अनेक आमदारा आंदोलनाकांच्य बाजून झाले आहेत. आमदार विक्रम काळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना पाठिंबा दिला.
 
शिक्षकांवर झालेला लाठीचार्ज हा दुर्दैवी असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली. सरकारला अनुदान द्यायचे नसल्यामुळे उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर तासाभरात हे काम होईल, पण त्यांची हे काम करण्याची इच्छा नाही. शेवटच्या काही कॅबिनेट राहिल्या असतानाही काम केले जात नाही. ज्यांना खरंच जनादेश आहे, त्यांना अशा महाजनादेश यात्रेची गरजच काय? असा सवालही विक्रम काळेंनी केला.
 
यावेळी धनंजय मुंडेंना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. यानंतर धनंजय मुंडे आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही पाहायला मिळाली. आमदारांना अडवण्याचा अधिकार कोणी दिला? कसले नियम सांगता? आम्हाला काही अधिकार आहेत की नाही? असे सवालही धनंजय मुंडेंनी सुरक्षा रक्षकांना केले.