आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील महायुतीचे विरोधक झाले सैरभैर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : राज्यात भाजप शिवसेना महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट असून त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजप महायुतीच्‍या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी येथे केले.

येथे भाजप उमेदवार आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार तथा उमेदवार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, नगरसेवक गणेश बांगर, दिलीप बांगर, दिवाकर माने, बाबू कदम आदी उपस्थित होते.या वेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेस सरकारने काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करून मोठे पाप केले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी हे कलम रद्द करून आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. काँग्रेस सरकारने विकासाच्या नावावर केवळ स्वतःचा व परिवाराचा विकास केला. त्यांच्या काळात राबवलेल्या विविध योजनांचा लाभही जनतेला मिळाला नाही. मात्र केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबव‍ल्या आहेत. आयुष्यमान भारत योजना, शेतकरी कर्जमाफी योजना, पीक विमा योजना आदी प्रमुख योजनांचा समावेश असून घरकुल योजनेतून गरजूंना हक्काचे घरकुल मिळाले आहे. केंद्र व राज्यात भाजप सरकारने केलल्या विकासकामांच्या जोरावर आपण मतदान मागण्यासाठी आलो असून मतदारांनी शिवसेना-भाजप महायुतीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभा ज्या ठिकाणी होतात, त्याठिकाणी काँग्रेसच्या जागा नक्कीच पराभूत होतात हे मागील काही निवडणुकांतून दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या सभेची काळजी करू नका, अशा श‍ब्दांत त्यांनी राहुल गांधींच्या सभांची खिल्ली उडवली.
 

बातम्या आणखी आहेत...