आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेला विराेधी पक्ष नक्की फीनिक्स भरारी घेतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर : महाराष्ट्रात हाेत असलेली विधानसभेची निवडणूक ही एक लढाई आहे. प्रचंड माेठ्या विजयानंतरची ही लढाई आहे. राखेतून पुन्हा उभारी घेणाऱ्या फीनिक्स पक्ष्यासारखी आम्हा विरोधी पक्षांची स्थिती अाहे. मात्र लढाईत अाम्ही निश्चित यशस्वी होऊ,' असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केला.

देशात महागाई, आर्थिक मंदीचे भीषण संकट असताना केंद्र व राज्यातील सरकारचा विचित्र कारभार अाहे. कांद्याचे दर वाढलेत, दीड काेटी लाेकांच्या नाेकऱ्या गेल्यात. पण अजूनही सत्ताधारी शहाणे झालेले नाहीत,' अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

गेल्या आठवड्यात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे साेलापुरात व्याख्यान झाले. या वेळी त्यांनी 'संघ, भाजप दहशतवादी तळ चालवतात, असे वक्तव्य तत्कालीन गृहमंत्री शिंदे यांनी केले हाेते. त्याचा संदर्भ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'युनो'मध्ये दिला', असे सांगत शिंदेंनी अाता माफी मागावी, अशी मागणी पात्रा यांनी केली होती. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता शिंदे म्हणाले, 'युनोत माझा उल्लेख केल्याबद्दल मी अभिनंदन करताे. हे मेलेले मुडदे पुन्हा उकरून काढण्यास 'संबित'ला कुणी सांगितले? असा प्रश्नही त्यांनी केला.

अमेरिकेलाही सोडलं नाही..
भाजपने 'अबकी बार २२० पार' अशी घोषणा केलीय. काँग्रेस-राष्ट्वादी आघाडीच्या राज्यात किती जागा येतील, या प्रश्नावर शिंदे म्हणाले, 'अबकी बार'मध्ये त्यांनी देशात कुणाला सोडलं नाही. देशातलं सोडून द्या, अमेरिकेच्या राष्ट्रपतींनाही सोडलं नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...