आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीन बागबाबत विरोधक गप्प : भाजप, सीएए समर्थक गांधींचे विरोधक : काँग्रेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संबित पात्रा यांनी वादग्रस्त भाषणाचा व्हिडिआे केला ट्विट

नवी दिल्ली- नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागमधील आंदोलनावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शाहीन बागेतील लोक भारताच्या विभाजनाचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी व अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगले आहे. ते तेथे का जात नाहीत? जिनादेखील भारतीय राजकारणात आले आहेत असे आम्ही ऐकले आहे. 

सीएए लागू केल्यास जिना यांच्या विचारांचा विजय होईल असे काँग्रेस नेते शशी थरूर म्हणतात. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी शाहीन बागेबाबत दुसरा व्हिडिआे ट्विट केला. हा एका तरुणीच्या भाषणाचा व्हिडिआे आहे. त्यावर संबित लिहितात- त्या नापाक शर्जील इमामनंतर या मोहतरमांना ऐका. ‘आमचा कोणावरही विश्वास नाही. सुप्रीम कोर्टावरही नाही.’ काँग्रेस नेते चिदंबरम यांनी ट्विट केले. त्यात ते म्हणतात- गांधीजींचा द्वेष करणाऱ्यांनाच सीएएचा विरोध नकोय. म्हणून सीएए समर्थक हे गांधीजींचे विरोधक म्हणावे लागतील. पश्चिम बंगाल विधानसभेतही सीएएच्या विरोधात प्रस्ताव मंजूर झाला आहे. 

वादग्रस्त भाषणावर सरकार-विरोधक भिडले

‘तुरुंगात पाठवायचे नाही?’

आसामला देशापासून तोडण्याच्या वक्तव्यावर जेएनयूचे माजी विद्यार्थी शर्जील इमामवर सोमवारी मणिपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दिल्लीच्या एका निवडणूक जाहीर सभेत गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. भारताचे तुकडे करू, असे वक्तव्य करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी परवानगी द्याल की नाही, असा प्रश्न त्यांनी केला. 

‘तुम्ही अटक करावी ?’

शहा यांच्या वक्तव्याच्या काही वेळाने केजरीवाल यांनी ट्विट करून पलटवार केला. ते म्हणतात- शर्जिलने आसामला देशापासून तोडण्याची भाषा केली. हे अतिशय गंभीर आहे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. तुमचे वक्तव्य निकृष्ट राजकारण दर्शवणारे आहे. शर्जीलला अटक करावी, हा तुमचा धर्म आहे. तुम्ही त्याला अटक का करत नाही? 

युरोपीय संघ - १५० खासदारांनी विरोधात प्रस्ताव आणला
  
ब्रुसेल्स- युरोपीय संघाच्या संसदेत सुमारे १५० खासदारांनी भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात प्रस्ताव मांडला. सीएएमुळे भारतात नागरिकत्व निश्चित करण्याच्या पद्धतीत बदल होईल. मोठ्या लोकसंख्येचा देश राहणार नाही, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. या प्रस्तावावर बुधवारी चर्चा व गुरुवारी मतदान होणार आहे. सीएए हा अंतर्गत प्रश्न असल्याचे भारताने स्पष्ट केले. 

५ पानी प्रस्तावात महत्त्वाचे मुद्दे 
 

  • सीएए लागू करणे जगात मोठ्या मानवी संकटाला जन्म देऊ शकते
  • हा कायदा धार्मिकतेच्या आधारे भेदभाव करणारा आहे.
  • कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे.
  • ही बाब मानवी हक्क व राजकीय संधींचादेखील अवमान आहे.
  • आंतरराष्ट्रीय मानवी हक्क करारातील कलम-१५ याचीही पायमल्ली आहे.
बातम्या आणखी आहेत...