आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपरगाव पालिकेसाठी निळवंडेतून पाणी पुरवठा योजनेला विरोधच; औरंगाबाद खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रवरा धरणातून पाणीपुरवठा योजना कोपरगाव नगर परिषदेसाठी असताना निळवंडेतून नवीन योजनेचा अट्टाहास कशासाठी? त्यांच्यासाठी या धरणातील पाणी राखीव असताना त्याचा निम्मादेखील वापर केला जात नाही. त्यामुळे निळवंडेतील योजना मंजूर करू नये अशा आषयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी प्रतिवादी राज्याच्या जलसंपदा आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे मुख्य सचिव, प्रवरा आणि निळवंडे धरणावरील मुख्य आणि कार्यकारी अभियंते त्याचप्रमाणे श्री साईबाबा शिर्डी संस्थान आणि कोपरगाव नगर परिषदेला नोटीसा बजावण्याचा आदेश शुुक्रवारी (२८ सप्टेंबर) दिला. 


याचिकेची पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामधील केळवड येथील शेतकरी दामोधर केशवराव गमे यांची जमीन १९९३ साली निळवंडे धरणासाठी संपादित करण्यात आली होती. निळवंडे धरणासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या अशा १८२ गावातील लोकांना निळवंडे धरणातील पाण्याचा लाभ अद्यापपर्यंत झाला नाही. अदळापपर्यंत या धरणाचे कामच पूर्ण झाले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

 

असे असताना निळवंडे धरणातून शिर्डी संस्थान व कोपरगाव नगर पंचायतीला पाणी पुरवठ्याची योजना तयार करण्यात आली. ज्याचा खर्च शिर्डी संस्थान करणार आहे. याचिकाकर्त्यासह १८२ गावांतील लोकांचा शिर्डी संस्थानला निळवंडे धरणातून पाणी पुरवठा करण्यास विरोध नाही. गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने सुद्धा १३ जून २०१८ च्या निर्णयान्वये केवळ शिर्डी संस्थानची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. जलसंपदाचे राज्यमंत्री यांनी २६ जून २०१८ आणि ४ जुलै २०१८ रोजी दूरध्वनीवरुन निळवंडे धरणातून कोपरगाव पालिकेचा पाणी पुरवठा प्रस्ताव सादर करण्याची तोंडी सूचना केली होती. त्यानुसार प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून सध्या तो प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे काम पाहत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...