आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुरत - मी निर्दोष असून विरोधक माझा आवाज बंद करू इच्छितात, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मानहानीच्या एका खटल्यात सुरतच्या न्यायालयात गुरूवारी ते हजर झाले हाेते. तुम्ही स्वत:वरील आराेप स्वीकारता का, असा प्रश्न मुख्य न्यायमूर्ती बी.एच. कापडिया यांनी केला. तेव्हा राहुल यांनी मानेने नकार दिला. लाेकसभा निवडणुकीच्या काळात कर्नाटकातील एका रॅलीत राहुल यांनी केलेल्या भाषणात सर्व माेदी चोर आहेत, अशा आशयाचे वादग्रस्त विधान केले हाेते. त्याविराेधात भाजप आमदार पूर्णेश माेदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्यापासून सवलत मिळवण्याची मागणी केली. पूर्णेश माेदींच्या वकिलांनी त्यास विराेध दर्शवला आहे. या याचिकेवर न्यायाधीशांनी १० डिसेंबरला निर्णय जाहीर होऊ शकतो. त्या दिवशी राहुल यांना हजर राहण्यापासून सूट देण्यात आली. आगामी सुनावणीच्या विराेधात नियमित सुनावणीही सुरू हाेणार आहे. मानहानीच्या अन्य एका प्रकरणात राहुल शुक्रवारी अहमदाबादच्या अतिरिक्त मुख्य महादंडाधिकारी आर.बी. इटालिया यांच्यासमाेर हजर हाेतील.
राहुल गांधी म्हणाले, राजकीय विराेधक मला गप्प करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच मी सुरतमध्ये आहे. माझ्यासाेबत एकजूट दाखवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेम व पाठिंब्याबद्दल आभारी आहे. सत्यमेव जयते, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
राहुल यांच्या बचावासाठी अधीर, सलमान खुर्शीद उतरले; ‘पक्षीय मुद्द्यांवर अंतर्गत पातळीवर चर्चा करा’
नवी दिल्ली । लाेकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चाैधरी यांनी राहुल गांधी यांचा बचाव करताना सलमान खुर्शीद यांना अंतर्गत मुद्द्यांवर पक्षीय पातळीवर चर्चा करण्याची मागणी केली. लाेकसभेनंतर काँग्रेसच्या पराभवानंतर आमचे नेते आम्हाला साेडून गेले, असे खुर्शीद यांनी सांगितले. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वक्तव्ये करणे याेग्य ठरणार नाही, असे अधीर यांनी सांगितले. खुर्शीद यांनी पक्षांतर्गत पातळीवर याबाबत चर्चा करायला हवी हाेती. पराभवाची जबाबदारी स्वीकारणे ही माझी नैतिक जबाबदारी हाेती, असे राहुल यांनी स्पष्ट केले आहे, याचीही चाैधरी यांनी आठवण करून दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.