आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Oppositions Doing Some Black Magic Spells Against Bjp Leaders, Claims Mp Sadhvi Pragya Thakur

भाजप नेत्यांवर 'मारक शक्ती'चा प्रयोग करत आहेत विरोधी पक्ष, भाजप नेत्यांच्या निधनावर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे विधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आपल्या विचित्र वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. खासदार प्रज्ञा सिंह यांच्या मते, विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांवर 'जादू-टोणा' आणि 'मारक शक्ती'चा प्रयोग करत आहेत. त्यामुळेच, एकानंतर एक भाजप नेते जगाचा निरोप घेत आहेत. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांनी आपले मत मांडले आहे. आपल्याला ही गोष्ट एका महाराजजींनी सांगितली होती. आता ते खरे वाटत असल्याचे सुद्धा साध्वी यांनी भर सभेत सांगितले.

मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना साध्वी म्हणाल्या, 'एका महाराजांनी मला सांगितले होते, की आपला वाइट काळ सुरू आहे. काही विरोधी पक्ष काही तरी करत आहेत. ते भाजप नेत्यांच्या विरोधात 'मारक शक्ती'चे प्रयोग करत आहेत. चालता-फिरता ऐकलेली महाराजांची ही गोष्ट मी तेव्हाच विसरून गेले होते. परंतु, आता एकानंतर एक भाजपचे ज्येष्ठ नेते जगाचा निरोप घेत असल्याचे पाहून मला या गोष्टीवर विचार करण्यास भाग पाडले आहे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी स्वच्छतेवर बोलताना आपली निवड नाले-सफाईसाठी झालेली नाही असे म्हटले होते. सोबतच, महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त देखील म्हटले होते.