आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत आदेश निघाले, 8.99 टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी महामंडळाचे पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणातून पाणी सोडण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करून पाणी सोडणसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार लवकरात लवकर जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोमवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक झाली होती, त्यानंतर कार्यकारी संचालकांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी कार्यकारी संचालकांनी आदेश दिले आहेत. 


8.99 tmc पाणी सोडणार 
जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुळा समुहातून 54 दलघमी (1.90 tmc), प्रवरा समुहातून 109(3.85 tmc), गंगापूर समूहातून 17 दलघमी (0.60 tmc), दारणा समुहातून 57.50(2.04 tmc) , पालखेड समुहातून 17(0.60 tmc) असे एकूण 254 दलघमी (8.99 tmc) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत

बातम्या आणखी आहेत...