आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: रात्रीच्या वेळी गस्तीसाठी किमान ४० टक्के पोलिस बळ ठेवण्याचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अमरावती जिल्ह्यात चार महीन्यात आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी ठाण्यात असलेल्या एकूण मणुष्यबळाच्या किमान ३० ते ४० टक्के कर्मचारी रात्रीच्या ड्युटीसाठी कार्यरत ठेवावे. त्यामुळे गस्तीला चार ते पाच कर्मचारी सोबत फिरू शकतात. अशा सूचना राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंग (कायदा व सुव्यवस्था) यांनी शुक्रवारी अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांना दिल्या आहेत. 


अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंग गणेशोत्सवाचा आढावा घेण्यासाठी शहरात आले होते. आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. जिल्ह्यात कर्तव्य बजावताना दोन पोलिसांचा खुन झाला. अशा घटना घडणे गंभीर बाब आहे. दरम्यान अशा घटना भविष्यात होवू नये म्हणून रात्रीच्यावेळी गस्तीसाठी जाणाऱ्या पोलिसांनी किमान ३ ते ४ जणांनी जावे. मात्र मणुष्यबळाची कमतरता असल्यामुळे ते अनेकदा शक्य होत नाही. सद्यास्थितीत अनेक ठाण्यांमध्ये रात्रीच्यावेळी दहा टक्केच मणुष्यबळ उपलब्ध राहते. त्यामुळे गस्तीसाठी एक किंवा दोनच पोलिस जातात. मात्र यापुढे रात्रीच्यावेळी ३० ते ४० टक्केच पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर राहीलेच पाहीजे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश एडीजी सिंग यांनी उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांना दिले आहेत. 


गणेशोत्सवाची तयारी योग्य पध्दतीने सुरू
एडीजी सिंग यांनी अमरावती पोलिस आयुक्त, परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पाोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. आतापर्यंत पोलिसांनी स्थानिक पातळीवर केलेली तयारी योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकिला परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, पोलिस आयुक्त संजय बाविस्कर, अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप झळके, वाशिमच्या मोक्षदा पाटील, अकोलाचे राकेश कलासागर, यवतमाळचे एम. राजकुमार व बुलडाणाचे दिलीप भुजबळ उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...