आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Order To Leave Kashmir; Travelers, Tourists Scared, Food Shops, Lunger Closed Immediately On Amarnath Yatra

काश्मीर साेडण्याचे आदेश; यात्रेकरू, पर्यटक धास्तावले; अमरनाथ यात्रामार्गावर खाद्यपदार्थांची दुकाने, लंगरही तातडीने केले बंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/ औरंगाबाद - जम्मू-काश्मीरमध्ये २५ हजार अतिरिक्त सैनिक पाठवण्याच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सरकारने अमरनाथ यात्रेकरू व पर्यटकांना तत्काळ काश्मीर खोरे सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी अमरनाथ यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांची दुकानेही लष्कराने बंद करायला भाग पाडली. या पार्श्वभूमीवर यात्रेकरुंमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अमरनाथ गुहेजवळ श्री अमरनाथ सेवा समिती, श्रीगंगानगर, राजस्थानतर्फे लंगर चालवणारे नवनीत शर्मा यांनी या परिस्थितीचा वृत्तांत ‘दिव्य मराठी’ला सांगितला, ताे त्यांच्याच शब्दात...

१५ ऑगस्टपूर्वी काहीतरी माेठे घडणार असल्याची चर्चा
अमरनाथ यात्रेची मुदत १५ ऑगस्टपर्यंत असताना २ ऑगस्ट राेजीच संपूर्ण यात्रा थांबवण्यात आली. सुरक्षा दलांनी लंगरचे परवाने रद्द केल्याचे पत्र मला दिले. त्यावर त्यांना काही प्रश्न विचारण्याची संधीही मिळाली नाही. अमरनाथ यात्रेत तैनात सर्व सुरक्षा दलांना माघारी बाेलावण्यात आले आहे. १५ ऑगस्टपूर्वी काहीतरी माेठे घडणार असल्याची चर्चा आहे. मलाही असे काहीतरी घडणार असल्याचे जाणवत आहे. गेल्या २४ वर्षांपासून या यात्रेदरम्यान माझा लंगर असतो. यापूर्वी अशी परिस्थिती कधीच आेढवली नाही. यंदाही यात्रा सुरू झाली तेव्हा सर्व काही सुरळीतच होते. पण २८ जुलैपासून वेगवान घटना घडामाेडी घडू लागल्या आहेत. आधी पहेलगाम आणि बालटाल या दाेन मार्गांवरून चालणाऱ्या यात्रा थांबविण्याचे आदेश मिळाले. दरड काेसळली असून यात्रेकरूंना पुढे जाता येणार नसल्याचे तेव्हा सांगण्यात आले. परंतु भाविक परत निघाले तेव्हा रस्त्यांमध्ये कुठेच दरड काेसळल्याचे दिसून आले नाही. पण यात्रेत साेबतत असलेले लष्करी, निमलष्करी दलाचे जवानही परतत असल्याचे दिसले. १ ऑगस्ट राेजी अमरनाथ गुहेजवळील सीआरपीएफची सुरक्षा हटविण्यात आली. वैद्यकीय सेवेचे युनिटही हलवले आहेत. सीआरपीएफ खाली यायला सुरूवात झाली म्हणजे श्रीअमरनाथ यात्रा संपली. यावर्षी पंधरा दिवस आदीच यात्रा बळजबरीने थांबविण्यात आली आहे. माझ्यासह अनेक दुकानदारांना जबरदस्तीने परत पाठविले जात आहे. 'त्वरित निघून जा. काही झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही,' असा इशाराही देण्यात येत आहे. सर्व सुरक्षा दले आपले तंबू हलवित आहेत. केवळ छडी मुबारक यात्रा शिल्लक राहिली. शंकराचार्यही लवकरच हेलिकाॅप्टरमध्ये बसून छडी मुबारक यात्रेची आैपचारिकता पूर्ण करतील. मला भेटणारा प्रत्येक जण आता लवकरात लवकर येथून बाहेर कसे पडता येईल, याच्याच चिंतेत दिसतो आहे. त्यातील बहुतांशजण जीवाच्या भितीने धास्तावले आहेत,' अशी शर्मा यांनी नमूद केले.