आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीला दणका; ७,२६१ कोटी रुपये व्याजासह पीएनबीला द्यावेत : आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - हिरे व्यापारी नीरव मोदी याला कर्जवसुली न्यायाधिकरणाने दणका दिला आहे. मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ७ हजार २६१ कोटी रुपये व्याजासह परत करावे, असा आदेश न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी शनिवारी दिला. मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पीएनबीच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेला तब्बल ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांच्यावर मोदीला मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मोदीने नेमक्या कशा प्रकारे फसवणूक केली याबाबतची माहिती २०० पानी निकालात देण्यात आली आहे. पीएनबीकडून अॅड. सिद्धार्थ मल्होत्रा व आर्दिश मजुमदार यांनी बाजू मांडली, तर मोदीकडून बाजू मांडण्यासाठी कोणीही नव्हते. बँक व मोदीमध्ये झालेले संवाद बँकेने सादर केले. इतरांना पुरेसा वेळ देऊनही त्यांचा प्रतिसाद आला नाही. निकाल विरोधात जाईल म्हणून त्यांनी समन्सदेखील घेतले नाहीत, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले. 

बातम्या आणखी आहेत...